२ लाख परत मिळत नसल्याने जळगावात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 12:30 IST2018-07-01T12:29:56+5:302018-07-01T12:30:54+5:30
जिल्हा रुग्णालयात उपचार

२ लाख परत मिळत नसल्याने जळगावात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
जळगाव : दुकान मिळण्यासाठी दिलेले दोन लाख रुपये व दुकानही मिळत नसल्याने संतप्त झालेल्या हर्षला माधव जाधव (३२, रा. शनिपेठ) या बांगड्या विक्री करणाऱ्या महिलेले विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हर्षला जाधव या फुले मार्केट परिसरात बांगड्या विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी श्याम नावाच्या व्यक्तीला दुकान मिळावे म्हणून दोन लाख रुपये दिले असल्याचे व या व्यक्तीचे पूर्ण नावदेखील माहित नसल्याचे महिलेचे म्हणणे आहे. दोन लाख रुपये दिले तरी दुकान मिळत नव्हते, त्यामुळे त्यांनी पैसे परत मागितले. मात्र तगादा लावूनही पैसे परत मिळत नसल्याने संतप्त झालेल्या या महिलेने शनिवारी दुपारी फुले मार्केट परिसरातच विषारी पदार्थ सेवन केला. त्या वेळी तेथे गोंधळ उडाला. त्यानंतर महिलेच्या आईने व परिसरातील नागरिकांनी महिलेला जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे महिलेवर उपचार करण्यात आले. शहर पोलीस ठाण्याच्यावतीने महिलेचा जबाब घेण्यात आला.