जळगावात भरधाव वाळुचा ट्रक दुभाजकावर आदळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 21:04 IST2018-06-29T21:01:39+5:302018-06-29T21:04:27+5:30

जळगावात भरधाव वाळुचा ट्रक दुभाजकावर आदळला
जळगाव- आकाशवाणी चौकाडून अजिंठा चौफुलीच्या दिशेने भरधाव जात असलेल्या वाळुच्या ट्रकवरील चालक पवन देवीदास नन्नवरे (वय-२३,रा. बांभोरी) याचे नियंत्रण सुटल्याने ट्रक इच्छादेवी चौकातील सिग्नल लावलेल्या दुभाजकावर आदळल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली़
दरम्यान, दुभाजकावर ट्रक चढताच दुभाजकावरील सिग्नल हे ट्रकच्या धडकेत जमीनीवर कोसळले़ त्याचवेळी तेथून पायी जात असलेली महिला बालंबाल बचावली़ अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीची कोंडी होऊन दोन्ही बाजून पाच किलो मिटरच्या अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या़ अखेर पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक के्रनच्या सहाय्याने बाजूला करून पोलीस ठाण्यात नेल्यानंतर वाहतुक सुरळीत करण्यात आली़