डॉ. बी.बी.चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:17 IST2021-05-26T04:17:32+5:302021-05-26T04:17:32+5:30

जळगाव : डॉ. भालचंद्र चौधरी (८८, मूळ रा. नशिराबाद) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, ...

Dr. B.B.Chowdhury | डॉ. बी.बी.चौधरी

डॉ. बी.बी.चौधरी

जळगाव : डॉ. भालचंद्र चौधरी (८८, मूळ रा. नशिराबाद) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते इंजिनियर शैलेश चौधरी व निमजाई हॉस्पिटलचे डॉ. नितीन चौधरी यांचे वडील होत.

------------

सरोजकुमार ठाकरे

जळगाव : सरोजकुमार ठाकरे (४६, रा. धनवाडी रोड, चोपडा) यांचे २५ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. ते आकाश ठाकरे यांचे वडील होत.

-----------

सरस्वती चौधरी

ममुराबाद : सरस्वती चौधरी (९०, रा. अशोकनगर) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. वसंत व कांतिलाल चौधरी यांच्या त्या आई होत.

-----------

रुख्माबाई वडनेरे

जळगाव : रुख्माबाई वडनेरे (सोनार) (७५, रा.आव्हाणे, ता.जि. जळगाव) यांचे २५ रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा २६ रोजी सकाळी ९ वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात पाच मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्या डॉ. राजेंद्र वडनेरे यांच्या आई होत.

----------

सोमनाथ तळेले

जळगाव : सोमनाथ तळेले (रा. जोशी पेठ) यांचे २५ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे. ते हिमांशू तळेले यांचे वडील होत.

अरविंद बोंडे

जळगाव : शहरातील हाऊसिंग सोसायटीतील रहिवासी अरविंद नामदेव बोंडे (८५) यांचे २५ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, जावई असा परिवार आहे. ते तुषार बोंडे यांचे वडील होत.

कुमुदिनी खडके

जळगाव : कुमुदिनी खडके (५६, रा. जळगाव) यांचे २५ मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या मुरलीधर शंकर खडके यांच्या पत्नी होत.

----------

ताईबाई पाटील

जळगाव : ताईबाई पाटील (८७, रा. टागोरनगर) यांचे २५ मे रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या माजी नगरसेवक प्रा. पी. जी. पाटील यांच्या काकू होत.

-----------

मंजुळाबाई करोडे

जळगाव : मंजुळाबाई करोडे (७८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सुन, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. अतुल करोडे यांच्या मातोश्री होत.

---------

गोविंद जोशी

जळगाव : गोविंद जोशी (९१) यांचे अल्पशा आजाराने २५ मे रोजी निधन झाले. ते विवेक जोशी यांचे वडील होत.

-----------

Web Title: Dr. B.B.Chowdhury