शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर दाम्पत्याने ‘कन्या’जन्माचे केले जंगी स्वागत..

By admin | Updated: March 21, 2017 00:06 IST

धरणगावातील आदर्श : कीर्तनातून स्त्रीजन्माच्या महतीवर प्रबोधन करीत आप्तेष्ट व मित्र परिवारांना दिले पुरणपोळीचे जेवण

धरणगाव : येथील कीर्तनकार   प्रा.सी.एस. पाटील यांचा डॉक्टर  मुलगा व सून यांच्या संसारवेलीवर  ‘आर्या’ हे कन्यार} फुलल्याने या डॉक्टर दाम्पत्याने कन्याजन्माचे जंगी स्वागत केले. यानिमित्त कीर्तन सोहळा आयोजित करून समाजाला स्त्रीजन्माची महती पटवून दिली. तसेच कन्येचा जन्मसोहळा गोड करण्यासाठी आप्तेष्ट आणि मित्र परिवाराला  प्रसादरूपी पुरणपोळीचे जेवण दिले आणि या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनाही सहभागी करून घेतले व समाजासमोर आदर्श उभा केला. संत साहित्याचे अभ्यासक तथा सेवानिवृत्त प्राध्यापक पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून कीर्तनातून समाजाचे प्रबोधन करीत आहेत.  त्यांचा परिवारही सामाजिक बांधिलकी जपणारा आहे. त्यांचा मोठा मुलगा डॉ.ज्ञानेश आणि सून डॉ.प्रियंका यांच्या संसारवेलीवर कन्येच्या रूपाने दुसरे फूल उमलले.   आर्या हिच्या रूपाने घरात कन्यार} आल्याने आजी-आजोबांसह  परिवाराला मोठा आनंद झाला. या कन्येच्या स्वागतासाठी डॉक्टर दाम्पत्याने शनिवारी सकाळी कीर्तन  आयोजित केले आणि दुपारी खीर-पुरणपोळीचा महाप्रसाद हजार लोकांना देऊन आनंदोत्सव साजरा केला. या वेळी  ह.भ.प. गुलाब महाराज लोणकर यांचे कीर्तन झाले. त्यांनी स्त्रीजन्माची महती विशद करून स्त्रियांच्या कार्याचे महत्त्व सांगितले. याप्रसंगी चि.आर्या हिचे पूजन प्रा.चत्रभुज व नंदा पाटील, तसेच डॉ.ज्ञानेश-डॉ.प्रियंका यांनी केले. कार्यक्रमाला ह.भ.प. अंबादास महाराज (कळमसरेकर), महंत ह.भ.प. भगवान महाराज, प्रा.रमेश महाजन, प्रा.मंगला पाटील, प्रा.सी.के. पाटील, प्रा.एम.एल. पाटील (धुळे), प्राचार्य डॉ.एस.आर. पाटील (म्हसदी), पी.आर. सोसायटीचे अध्यक्ष, डॉ.अरुण कुळकर्णी, सचिव डॉ.मिलिंद डहाळे, माजी नगराध्यक्ष अजय पगारिया, शर्मिला दगडूसिंग पाटील, प्रा.वा.ना. आंधळे, प्रा.के.एम. पाटील, प्राचार्य डॉ.टी.एस. बिराजदार, प्रा.मेजर अरुण वळवी, प्रा.छाया सुखदाणे, इंदिरा गांधी विद्यालयाचे सचिव सी.के. पाटील, प्रा.मनीषा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.