शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कचर्‍याची विल्हेवाट उघड्यावर

By admin | Updated: November 5, 2014 15:03 IST

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बंद असल्याने मनपाकडून शहरातील गोळा केलेला कचरा त्या-त्या भागातच ठराविक ठिकाणी उघड्यावर टाकून दिला जात आहे.

 

जळगाव : प्रशासनाकडून नागरिकांमध्ये साफसफाईबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अभियान राबविले जात असतानच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बंद असल्याने मनपाकडून मात्र शहरातील गोळा केलेला कचरा त्या-त्या भागातच ठराविक ठिकाणी उघड्यावर टाकून दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे. 
शहरातून दररोज १00 ते १२0 टन कचरा गोळा करून या प्रकल्पावर नेला जातो. मात्र प्रकल्प बंद असल्याने कचर्‍यावर प्रक्रिया होत नसल्याने गेल्या दीड वर्षांपासून हजारो टन कचरा या प्रकल्पाच्या आवारात जमा झाला आहे. 
त्यामुळे प्रकल्पाच्या प्रवेशद्वारापासूनच कचर्‍याचे मोठे ढीग साचले आहेत. ते पेटवून देण्यात येत आहेत. तर काही ढीग आपोआपच पेट घेत आहेत. घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २000 नुसार घनकचरा प्रकल्प अचानक बंद करता येत नाही. कारण त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार कचर्‍यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया होणे आवश्यक आहे. त्यामुळे दिवसाकाठी या प्रकल्पात जमा होणार्‍या १00 ते १२0 टन कचर्‍याची त्याच रात्री प्रक्रिया करून विल्हेवाट लावली जाते. कारण हा कचरा जर जास्तवेळ पडून राहिला तर त्यातून C2H2 म्हणजेच ग्रीन गॅस( मार्श गॅस) तयार होतो. त्याचा वातावरणातील O3 शी संयोग होऊन CO2 (कार्बनडाय ऑक्साईड) व H2O (पाणी) तयार होते. ते देखील वातावरणास घातक आहे. त्यामुळे कचरा पडून न राहू देता त्यावर तातडीने प्रक्रिया केली जाते. मात्र सुमारे दीड वर्षांपासून प्रकल्प बंद असून तेथे शहरातील कचरा मात्र दररोज जमा होत आहे. त्यामुळे आतापर्यंत हजारो टन कचरा प्रक्रियेविनाच पडून आहे.
-------------
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प दीड वर्षांपासून बंद पडला आहे. कचर्‍याचे ढीगच्या ढीग साठले आहे. त्यावर प्रक्रिया होत नसल्याने त्यातून विषारी वायूचे उत्सर्जन वातावरणात सुरू आहे. त्यामुळे या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी तातडीने पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे. मात्र मनपा प्रशासन ढीम्म आहे. यादृष्टीने काहीही हालचाली अद्यापपर्यंत झालेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे. जुनी न.पा.च्या जागेवरील खड्डय़ात मनपातर्फे कचरा टाकून पेटवून देण्यात येत आहे. शहरातील कचरा हंजीरच्या जागेत नेऊन टाकला जात असल्याने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे डंपींग ग्राऊंड बनले आहे. आता तर तेथे कचरा टाकण्यासाठीही जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे मेहरूण व परिसरातील कचरा मेहरूण तलावाच्या सांडव्याच्या काठावर टाकण्याचे उद्योग आरोग्य विभागाकडून सुरू आहेत. तसेच स्मशानभूमीजवळ, मिल्लतनगर समोरील (अक्सानगर) रस्त्यावर, प्रजापतनगर या ठिकाणी कचरा टाकला जात आहे. त्यामुळे या कचर्‍यातून निघणार्‍या विषारी वायू व दुर्गंधीमुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सर्रास जाळला जातो कचरा घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २000 नुसार कचर्‍यावर प्रक्रिया करणे बंधनकारक असून कचरा जाळणे गुन्हा आहे. मात्र तरीही सर्रास कचरा पेटवून दिला जात आहे. त्यामुळे सफाई मोहिमेबरोबरच याकडेही लक्ष देण्याची मागणी होत आहे.