शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वाआयुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

शेकडोंचा आधारवड हरपला; रतनलाल बाफना यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2020 16:06 IST

सुवर्णनगरी पोरकी; संध्याकाळी पाच वाजता अहिंसा तीर्थ येथे अंत्यसंस्कार

जळगाव : शाकाहार सदाचारचे प्रणेता, स्वर्णनगरी जळगावचे नाव देशभर पोहचविणारे, सुवर्ण व्यावसायिक आर.सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक रतनलाल सी. बाफना (८६) यांचे सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी पाच वाजता अहिंसा तीर्थ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.बाफना यांच्या निधनामुळे जळगावातील व्यापार, उद्योग, सामाजिक क्षेत्रात दुःखाचे वातावरण पसरले असून शेकडोंचा आधारवड हरपल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थमुळे बाफना यांच्यावर उपचार सुरू होते. 

जळगावात एक छोटेसे दुकान टाकून सुवर्ण व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवणारे बाफना यांनी विश्वास, सचोटी, पारदर्शकता या बळावर जळगावातील सोने देशभर पोहचविले. एका छोट्या दुकानापासून मोठ्या शोरूमपर्यंतचा प्रवास करणारे बाफना यांनी या व्यवसायाच्या माध्यमातून शेकडोंना रोजगार उपलब्ध करून दिला. हळूहळू हा व्यवसाय औरंगाबाद, नाशिक अशा वेगवेगळ्या शहरात बाफना ज्वेलर्सच्या शाखा सुरू केल्या. या सोबतच जळगावनजीक गोशाळा सुरू करून मुक्या गुरांना आधार दिला. 

शैक्षणिक मदतबाफना यांनी व्यवसायासोबत सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक संकटात असलेल्यांना आधार दिला. तसेच अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करीत त्यांना आधार दिला. 

बाफना यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. या परिवारासोबतच सुवर्ण पेढ्यांमधील कर्मचाऱ्यांचाही आधार हरविल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे. 

जैन समाजासाठीही मोठे योगदानव्यवसाय, गोरक्षा अशा कार्यासह बाफना यांनी जैन धर्मियांच्या साधू संत, मुनी यांच्यासाठी निवासस्थान, धर्मशाळा सुरू केल्या.