खेळताना पाय घसराला; १२ वर्षीय वैभव पाटीलचा गिरणा नदी पात्रात बुडून मृत्यू 

By Ajay.patil | Published: October 18, 2023 04:10 PM2023-10-18T16:10:12+5:302023-10-18T16:10:53+5:30

तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Died12-year-old Vaibhav Patil because of drowned in Girna river | खेळताना पाय घसराला; १२ वर्षीय वैभव पाटीलचा गिरणा नदी पात्रात बुडून मृत्यू 

खेळताना पाय घसराला; १२ वर्षीय वैभव पाटीलचा गिरणा नदी पात्रात बुडून मृत्यू 

जळगाव- तालुक्यातील आव्हाणे येथील गिरणा नदी पात्रात पाय घसरून एका १२ वर्षीय बालकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी २.३० वाजता उघडकीस आली आहे. तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वैभव नरेंद्र पाटील (वय १२) असे मृत झालेल्या बालकाचे नाव आहे. वैभव हा सहावीच्या वर्गात शिकत होता. मंगळवारी दुपारी ३ वाजता घरातून निघाला होता. सायंकाळी उशीरापर्यंत वैभव घरी न आल्यामुळे नातेवाईकांनी वैभवचा शोध घेतला. गावात व शेतीशिवारात शोध घेतल्यावर देखील वैभव आढळून आला नाही. त्यामुळे मंगळवारी रात्री उशीरा नातेवाईकांनी तालुका पोलीस स्टेशनला मिसींगची नोंद केली होती.

नदीच्या पाण्यात तरंगताना दिसला मृतदेह

पोलीस ठाण्यात नोंद केल्यानंतर बुधवारी देखील नातेवाईकांकडून वैभवचा शोध घेतला जात होता. गावातील काही जणांनी वैभवला दुपारच्या वेळेस गिरणा काठावरील महादेव मंदिरात खेळताना पाहिले. याठिकाणी वैभवचे काका धीरज पाटील यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर खेळताना वैभव नदीवर गेला असावा या शंकेने बुधवारी दुपारी २ वाजता धीरज पाटील व स्वप्नील जोशी यांच्यासह काही जण नदी पात्रात शोध घेत असताना, २.३० वाजता गिरणेच्या वरच्या भागातील पात्रात वैभवचा मृतदेह तरंगताना आढळून आला. धीरज पाटील यांनी लगेच नातेवाईकांना कळविले.

१२ वर्षाच्या मुलाच्या मृत्यूने आई-वडिलांसह नातेवाईकांवर मोठा आघात बसला आहे. तालुका पोलीसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केल्यानंतर, मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. वैभव सहावीच्या वर्गात शिकायला होता. वैभवला एक लहान भाऊ आहे. वैभवच्या नवीन घराचे काम सुरु झाल्यामुळे वैभवचे आई-वडिल नदीच्या बाजुला असलेल्या एका घरात एक महिन्यांपुर्वीच रहायला आले होते. दरम्यान, वैभव हा शेतात जायला निघाला असेल किंवा नदीवर खेळायला गेला असावा, त्याठिकाणी पाय घसरून तो नदीत पडला असावा अशी शंका नातेवाईकांनी व्यक्त केली.

Web Title: Died12-year-old Vaibhav Patil because of drowned in Girna river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव