शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

धुळ्यातील विद्यार्थिनी मदतीसाठी सरसावली, अपघातस्थळी मदतीचा किरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 1:00 PM

जखमी चालकही सुखावला

जळगाव : उभ्या बसवर आदळलेल्या ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात यश आले खरे. मात्र १०८ ची सेवा मदतीऐवजी प्रश्नांचाच भडीमार करीत असताना बसमधील एक युवती सरसावली आणि तिने घरचा प्रवास सोडून प्राथमिक उपचार करुन जखमी चालकाच्या आयुष्याला नवसंजीवनी दिली.धुळ्यातील नर्सिंग कॉलेजची किरण तोतडे ही विद्यार्थिनी वर्धा येथील मूळ गावाकडच्या प्रवासाला निघाली होती. मंगळवारी पाच वाजेच्या सुमारास वाहतूक विस्कळीत झाल्याने वाडा-शेगाव ही बस पिंपळकोठानजीक थांबली. मागावून भरधाव वेगात येणारा ट्रक बसवर आदळताच सर्वच प्रवासी भेदरले.ट्रकचा चालक कॅबीनमध्ये अडकल्याचे लक्षात येताच सर्वच प्रवाशांनी धाव घेतली आणि कॅबीनचे दरवाजे तोडून चालकाला बाहेर काढले. प्रचंड रक्तस्त्राव सुरु असताना १०८ या रुग्णवाहिका सेवेला संपर्क केला. तिथल्या प्रश्नांनी सर्वच वैतागले.तेव्हा किरण सरसावली आणि तिथे जखमी चालकावर प्राथमिक उपचार केले. चालकाला धीर देत उपचार सुरु केल्यावर प्रवाशांनाही समाधान वाटले. भुसावळहून सात वाजता रेल्वेगाडीने वर्ध्याला जायचे म्हणून तीही काळजीत पडली. तेव्हा एका वयस्क महिलेने तिला धीर दिला.तू उपचार सुरु ठेव आणि आज रात्री माझ्या घरी मुक्कामाला थांब म्हणून किरणला विनवले. तेव्हा किरणने तिच्या आईला फोनवरुन अपघातकार्याची माहिती दिली आणि सकाळी घरी येईल म्हणून सांगून टाकले.तेव्हा ती वयस्क महिलाही भारावली आणि किरणच्या पाठीशी उभी राहिली.४० मिनिटानंतर रुग्णवाहिका आल्यावर जखमी चालकाला हलविण्यात आले. त्यानंतर वाडा-शेगाव बसच्या वाहक-चालकांनी किरणला दुसऱ्या बसने मार्गस्थ केले. तेव्हा सारेच सुखावलेले चेहरे तिच्या मदतकार्याच्या समाधानाने निरोप घेत गेले व सर्वच प्रवाशांनी किरणचे कौतुकही केले.

टॅग्स :Jalgaonजळगाव