शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
4
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
5
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
6
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
7
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
8
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
9
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
10
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
11
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
12
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
13
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
14
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
15
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
17
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
18
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
19
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
20
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा मंत्री असतानाही, बहिणाबाईंच्या गावात पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:58 IST

जळगाव : नादुरुस्त रस्ते, खड्डे आणि धुळीने जळगावकर हैराण आहेत. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री जळगावात असतानासुध्दा कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ...

जळगाव : नादुरुस्त रस्ते, खड्डे आणि धुळीने जळगावकर हैराण आहेत. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री जळगावात असतानासुध्दा कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या आसोदा गावात पाणी नाही, ही मोठी शोकांतिका असल्याचे मत वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

वंचित बहुजन युवक आघाडीच्यावतीने राज्यभरात युवक जोडो अभियान राबविण्यात येत आहे़ उत्तर महाराष्ट्रात या अभियानाला सोमवारपासून जळगावातून सुरुवात झाली. त्यानिमित्ताने नीलेश विश्वकर्मा जळगावात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

याप्रसंगी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोळे, चेतन गांगुर्डे, जितरत्न पटाईत, राज्य सदस्या शमिभा पाटील, विनोद सोनवणे, प्रमोद इंगळे आदी उपस्थित होते. महाराष्ट्रासाठी काही करून दाखविण्यासाठी युवकांना आघाडीशी जोडून घेतले जात आहे़ प्रत्येक निवडणूक लढविली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये तरुणांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे अभियानाच्या माध्यमातून तरुणांची संवाद साधणार असल्याचे नीलेश विश्वकर्मा यांनी सांगितले. जळगाव, धुळे, नंदुरबार येथेही हे अभियान राबविले जाईल़ त्याचबरोबर सध्या जळगावकर विविध समस्यांनी त्रस्त आहेत़ त्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचेही विश्वकर्मा यांनी सांगितले. युवक जोडो अभियानाच्या माध्यमातून सर्व समाजातील युवकांना संधी दिली जाणार आहे. ऑनलाईन नोंदणीची सुविधासुध्दा युवकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

अन्यथा राजीनामा द्या...

जळगावकरांच्या समस्या सोडविण्यासाठी मनपा व सत्ताधारी सपशेल फेल ठरले आहे. समस्या सोडविता येत नसेल त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. नुकतेच वीज बिल न भरल्यामुळे वीज कनेक्शन कापल्या गेलेल्या एका गावातील ५२ घरांचे कनेक्शन आघाडीने जोडून दिले. जळगावातही तसे झाले तर कनेक्शन जोडून देण्यासाठी आघाडीतर्फे प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.