पाचोरा येथील गर्भवती महिलेला डेंग्यूची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:06 IST2018-09-13T00:06:11+5:302018-09-13T00:06:33+5:30
संध्याकाळी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले

पाचोरा येथील गर्भवती महिलेला डेंग्यूची लागण
जळगाव : जिल्ह्यात डेंग्यू हातपाय पसरवू लागला असून भुसावळ पाठोपाठ आता पाचोरा येथेदेखील डेंग्यूचा रुग्ण आढळून आला आहे.
पाचोरा येथील २२ वर्षीय गर्भवती महिलेला ताप व इतर त्रास होऊ लागल्याने तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे रक्ताची तपासणी केली असता त्यात डेंग्यू असल्याचे निदान झाले. त्यानंतर तिला बुधवारी संध्याकाळी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून येथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. भुसावळ येथे डेंग्यूचे सहा रुग्ण आढळून आल्यानंतर आता पुन्हा पाचोरा येथेही रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.