शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

ठेवीदारांची शपथपत्रावरून बचाव व सरकार पक्षात खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:11 IST

युक्तीवादात ॲड.चव्हाण यांनी सांगितले की, विवेक ठाकरे यांच्यात टेम्परींग करण्याची ताकद आहे. पोलीस कोठडीत असताना त्यांनी ठेवीदारांची ९ शपथपत्रे ...

युक्तीवादात ॲड.चव्हाण यांनी सांगितले की, विवेक ठाकरे यांच्यात टेम्परींग करण्याची ताकद आहे. पोलीस कोठडीत असताना त्यांनी ठेवीदारांची ९ शपथपत्रे करुन घेतली. यावर आरोपीचे वकील उमेश रघूवंशी यांनी आक्षेप घेतला. कोठडीत असताना कसे काय हे करु शकतो. पोलिसांनी इतरांशी बोलायला सवलत दिली होती का? असा आक्षेप नोंदविला. आम्ही ठेवीदारांकडे गेलो नाही. ते आमच्याकडे आले होते, असे सांगितले. दोन्ही वकिलांमध्ये बराचवेळ शाब्दीक खडाजंगी झाली. बीएचआर प्रकरणात अटक झालेल्या पाचही संशयित आरोपींना पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर रविवारी पुण्याच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे सरकारी वकिलांनी आरोपींच्या पोलीस कोठडीसाठी तर बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीसाठी युक्तीवाद केला. बचाव पक्षाच्या वकिलांच्या आक्षेपावर ॲड.चव्हाण यांनी सांगितले की, पुण्यातील लोक जळगावला गेले नव्हते. तुम्ही सारसबागेत आला होता. बनावट वेबसाईट बनविणाऱ्याची माहिती मिळाली आहे. महावीर जैन यांची नेमणूक केली नसताना त्याचे मानधन कंडारे याने कसे काय दिले. यामुळे महावीर जैन यांची संपूर्ण कृती संशयास्पद दिसून येते. आरोपींना वाचविण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्यासह सर्वांची चौकशी करायची आहे. हा सर्व कटकारस्थानाचा भाग आहे. २ ते ३ व्यक्तींचे जबाब नोंदविण्यात आले आहे. फाॅरेन्सिक ऑडिट आणि ऑडिट यात फरक आहे.

विवेक ठाकरेला किंग बनायला होते

विवेक ठाकरे यांना स्वत:ला किंग बनायचे होते. त्यामुळे यातील इतरांना बाजूला करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांनी पुण्यातील सारसबागेत बैठक घेतली. सोसायटी प्रस्तावित असताना त्यावर पैसे जमा केले. बाहेरच्यांच्या पावत्या केल्या. ३० ते ४० जणांच्या तक्रारी आहेत. ॲड. उमेश रघुवंशी यांनी सांगितले की, ठाकरे व कंडारे यांचा काही संबंध नाही. पोलिसांनी त्यांच्या घरातून जप्त केलेली सर्व १२७ प्रकरणे मी स्वत: दिली आहेत. ज्या बैठका घेतल्या. त्यात कोण कोण उपस्थित होते, यांच्या सह्या घेतलेली कागदपत्रेही पोलिसांनी जप्त केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सर्व जणांची यादी आहे. ठेवीदारांच्या वतीने आपण काम पहात होतो. ठेवीदारांना प्रत्येक वेळी जळगाव येणे शक्य नसल्याने त्यांनी त्यांच्या मुळ ठेवपावत्या आपल्याकडे दिल्या होत्या. पोलिसांनी मागील पोलीस कोठडीच्या वेळी जी कारणे दिली आहेत, तीच कारणे यामध्ये पुन्हा दिली आहेत. ठेवीदारांना व्याजासह सर्व पैसे मिळावेत, अशीच आपली भूमिका आहे. ९ ठेवीदारांनी शपथपत्र दिली असून त्यात त्यांनी विवेक ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. आमची कोणतीही फसवणूक झाली नसल्याचे सांगितले. पोलिसांनी जप्त केलेली कागदपत्रे ही माहिती अधिकारात मिळविलेली आहेत. ठेवीदारांसाठी लढा उभारतोय आहे हा गुन्हा आहे का? सामाजिक संस्थेमार्फत पारदर्शक काम करतो असे त्यांनी सांगितले. कमलाकर कोळीचा बचाव मांडताना ॲड. रघुवंशी यांनी सांगितले की, आपण चालक म्हणून कंडारे सांगतील, त्या ठिकाणी घेऊन जाणे हे काम होते. आपण ऑफिसर बेअरर नाही. फक्त चालक होतो. त्यामुळे त्यांनी कोणाबरोबर काय व्यवहार केले याच्याशी आपला काहीही संबंध नाही. दरम्यान, ठेवीदारांच्या वतीने ॲड. मनोज नायक, ॲड, अक्षता नायक यांनी आज न्यायालयात एक अर्ज केला. त्यात ठेवीदारांच्या वतीने आपल्याला बाजू मांडण्यास संधी द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे.