कर्जबाजारीपणामूळे व्यसनाधीन होवून केली दाम्पत्याची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 10:05 AM2020-09-12T10:05:40+5:302020-09-12T10:07:07+5:30

जळगाव : रावेर तालुक्यातील रोझोदा येथील भारंबे या वयोवृद्ध दाम्पत्यांचा निर्घुन खुन केल्याची घटना गुरुवारी, १० सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या ...

Debt-ridden couple murdered | कर्जबाजारीपणामूळे व्यसनाधीन होवून केली दाम्पत्याची हत्या

कर्जबाजारीपणामूळे व्यसनाधीन होवून केली दाम्पत्याची हत्या

googlenewsNext

जळगाव : रावेर तालुक्यातील रोझोदा येथील भारंबे या वयोवृद्ध दाम्पत्यांचा निर्घुन खुन केल्याची घटना गुरुवारी, १० सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपासचक्रे फिरवित शेजारीच राहणार्‍या परेश खुशाल भारंबे (३२) या संशयित आरोपीच्या अवघ्या आठ तासातच मुसक्या आवळल्या. परेश हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी असून व्यसनामुळे कर्जबाजारी झाल्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
याबाबत पोलसांकडून मिळालेली माहिती अशी की, मतय भारंबे यांच्या घराशेजारील परेश खुशाल भारंबे हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असुन तो व्यसनाधीन झाला होता. या व्यसनामुळे परेश हा कर्जबाजारी झाला होता. दिवसभर हा त्या दाम्पत्याच्या घरासमोरच बसलेला असायचा त्यामुळे शेजारी राहणार्‍या ओंकार भारंबे व त्यांच्या पत्नीकडे असलेल्या पैशांचा अंदाज त्याला होता. त्यामुळे याठिकाणी चोरी करुन डोक्यावरील कर्ज फेडण्याचे त्याचे नियोजन होते.
चोरी करण्यासाठी गेला अन् खून करुन आला
बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास परेश हा चोरी करण्यासाठी शेजारी राहणार्‍या ओंकार भारंबे यांच्या घरात शिरला. यावेळी त्याने त्यांच्या घरातून काही रोख रक्कमेची चोरी केली. परंतु या दाम्पत्याला जाग आल्याने त्यांनी परेशला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र परेशने सोबत नेलेल्या सुरीने त्यांच्या गळ्यावर सपासप वार करुन त्यांचा निर्घुन खून केल्याचे समोर आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ठाण मांडून
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासचक्रे फिरविले. घटनेचा तपासासाठी डिवायएसपी गजानन राठोड, सपोनि राहुल वाघ, राजेंद्र पवार, पांडुरंग सपकाळे, विनोद पाटील, रिजवान पिंजारी, देवेंद्र पाटील, सुरेश अढायगे, संजीव चौधरी, मेहरबान तडवी, हेमराज भावसार, जगदिश पाटील, बाळु मराठे, विशाल खैरनार, योगेश सावळे, उपनिरीक्षक सुधाकर लहारे, राजेंद्र पाटील, विजय पाटील, शरीफोद्दीन काझी, अनिल इंगळे, राजेश मेंढे, संजय हिवरकर, रमेश चौधरी, संतोष मायकल, युनुस शेख, किशोर राठोड, नंदलाल पाटील, अरुण राजपुत, राहुल पाटील, नरेंद्र वारुळे हे सकाळपासून गावातच ठाण मांडून होते.
श्‍वानाने माग दाखविल्याने मिळाली तपासाला दिशा
घटनेचे गांभीर्यठेवत डॉगस्क्वॉड व फॉरेन्सीक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल झाले. श्‍वानाने भारंबेच्या घरातून थेट शेजारी राहणार्‍या परेशच्या घराचा मार्ग दाखविल्याने या पोलिसांना गुन्ह्याच्या तपासाला दिशा मिळाली. त्यानंतर रात्री ११ वाजेच्या सुमारास परेशला त्याच्या घरुन अटक केली असून त्याने व्यसनामूळे कर्जबाजारी झाल्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्या विरुद्ध सावदा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.

Web Title: Debt-ridden couple murdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.