खून प्रकरणातील बंदीवानाचा मृत्यू; कारागृहात असताना आजारामुळे रुग्णालयात सुरू होते उपचार

By विजय.सैतवाल | Published: February 6, 2024 05:32 PM2024-02-06T17:32:44+5:302024-02-06T17:33:23+5:30

याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  

Death of prisoner in murder case while in prison treatment is started in the hospital due to illness | खून प्रकरणातील बंदीवानाचा मृत्यू; कारागृहात असताना आजारामुळे रुग्णालयात सुरू होते उपचार

खून प्रकरणातील बंदीवानाचा मृत्यू; कारागृहात असताना आजारामुळे रुग्णालयात सुरू होते उपचार

विजयकुमार सैतवाल, जळगाव : खुनाच्या गुन्ह्यात संशयित म्हणून जिल्हा कारागृहात असलेल्या भीमा ऊर्फ पंकज अशोक वाणी (४०, रा. विसनजीनगर) या बंद्याचा मंगळवार, ६ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्धर आजाराने मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  

दि. १८ एप्रिल २०१७ रोजी शनिमंदिर परिसरातील एका घराच्या तळमजल्यात प्रवीण ऊर्फ नितीन सुरेश माळी (२८, रा.सत्यम पार्क), भीमा ऊर्फ पंकज अशोक वाणी (रा. विसनजीनगर) व राहुल जयराम सपकाळे (२३, रा.काचंननगर) हे पत्ते खेळत होते. त्यावेळी पूर्ववैमनस्येतून वाद होऊन प्रवीण माळी या तरुणाच्या डोक्यात दगड टाकून खून करण्यात आला होता. त्यानंतर भीमा ऊर्फ पंकज वाणी व राहुल सपकाळे हे फरार झाले होते. पोलिसांनी पंकजला सीएसटी रेल्वेस्थानकातून, तर राहुल याला असोदा रस्त्यावरून अटक केली होती.

या प्रकरणात पंकज वाणी हा जिल्हा कारागृहात बंदिवान होता. पंकज वाणी याला दुर्धर आजार झाल्याने गेल्या सहा ते सात महिन्यांपासून १० ते १२ वेळा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले. ३ फेब्रुवारी रोजी, त्याची प्रकृती पुन्हा खालावल्याने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना मंगळवार, ६ फेब्रुवारी रोजी, सकाळी साडेसहा वाजता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत पंकज वाणी याच्या पश्चात आई, तीन भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Death of prisoner in murder case while in prison treatment is started in the hospital due to illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.