शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला दणका

By admin | Updated: October 20, 2014 10:07 IST

रावेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अब्दुल गफ्फार मलिक यांनी तब्बल ३१ हजार २७१ मते घेतल्याने काँग्रेस उमेदवाराला फटका बसला.

 

■ रावेर मतदारसंघात अल्पसंख्याक, मराठा व दलित मतांची मोट बांधून विजयी होण्याचे स्वप्न उराशी घेऊन आखाड्यात उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अब्दुल गफ्फार मलिक यांनी तब्बल ३१ हजार २७१ मते घेतल्याने काँग्रेस उमेदवाराला फटका बसला. पहिल्या यादीत सहयोगी मावळते आमदार शिरीष चौधरी यांना काँग्रेसची उमेदवारी घोषित करणार्‍या काँग्रेसला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. अटीतटीच्या चौरंगी लढतीत चौधरी यांचा १0 हजाराने पराभव करून जनादेशाने जबर धक्का दिला आहे. भाजपाचे हरिभाऊ जावळे यांना मिळालेल्या १0हजारांच्या मताधिक्यात शिवसेना, मनसे, बसपा या पक्षांच्या १२ उमेदवारांची अनामतही जप्त होण्याचा प्रसंग ओढवला. प्रचाराच्या रणधुमाळीत भाजपचे उमेदवारजावळे यांच्याविरुद्ध यावल तालुक्यात मसाकासंबंधी प्रचंड नाराजी आहे. भोरगाव लेवा पंचायतचा कल शिरीष चौधरी यांच्या बाजूने आहे. भाजपनेते एकनाथराव खडसे यांची जावळेंबाबत नाराजी आहे.अशा चर्चांना मोठय़ा प्रमाणात ऊत आला होता. रा.काँ. उमेदवार अब्दुल गफ्फार मलिक यांना मतविभागणीसाठी जैन पितापुत्रांनी रिंगणात दाखल केले आहे. ते स्थानिक उमेदवार नसल्याने त्यांना अल्पसंख्याक समाजाने जवळ करू नये. असा प्रचार करण्यात आला.मात्र मावळते आमदार शिरीष चौधरी यांच्या नावाखाली अधिकारी आणि कार्यकर्त्यांना वेठीस धरणार्‍या त्यांच्या नातेवाइकांमुळेच मतदारांनी जावळे यांना स्वीकारल्याचे मानले जात आहे. चौधरी यांच्या पराभवास त्यांचे जवळचेच लोक कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात अब्दुल गफ्फार मलिक यांच्या झोळीत केवळ अल्पसंख्याक मतांचाच जोगवा पडल्याचे स्पष्ट झाले. रा.काँ.चे अध्यक्ष शरद पवार व अजित पवार यांच्या नेतृत्वाला साद घालत मराठा समाज रा.काँ.कडे वळेल, अशी शक्यता मात्र मतदारांनी फेटाळली आहे. रा.काँ.च्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी रमेश पाटील यांची नियुक्ती झाल्यामुळे त्यांच्या पक्षांतर्गत प्रतिस्पध्र्यांनी कायम जिल्हाध्यक्षपदाची पदोन्नती नको म्हणून ही शक्ती पणाला लावल्याचे स्पष्ट होते. सातपुड्याच्या कुशीतील आदिवासी बहुल गावांचा पट्टा वगळता शिरीष चौधरी यांना रावेर व यावल तालुक्यातील लेवा पाटीदार बहुल मोठ-मोठय़ा गावांनी साफ नाकारल्याची वास्तवता आहे. अल्पसंख्याक समाजानेही नाकारले. जावळे यांना लोकसभेत उमेदवारी नाकारल्याची सहानुभूती असली तरी मोदी लाटेची ओसरती कडा त्यांना तारणारी ठरली आहे.सन १९९५ मध्ये मधुकरराव चौधरी यांच्या पराभवास कारणीभूत ठरलेल्या अँड.याकूब तडवीप्रमाणे पुनरावृत्ती होऊन रा.काँ.चे अब्दुल गफ्फार मलिक यांनी शिरीष चौधरी यांना पराभवाचे दर्शन घडवल्याचे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही.