Jalgaon: अमळनेर येथे दोन गटात दगडफेक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 23:49 IST2023-03-30T23:48:46+5:302023-03-30T23:49:09+5:30

Crime News: अमळनेर शहरात गुरुवारी सकाळी दोन गटात किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचे रुपांतर रात्री दगडफेकीत झाले.

Crime: Stone pelting in two groups at Amalner | Jalgaon: अमळनेर येथे दोन गटात दगडफेक 

Jalgaon: अमळनेर येथे दोन गटात दगडफेक 

- संजय पाटील
जळगाव  : अमळनेर शहरात गुरुवारी सकाळी दोन गटात किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचे रुपांतर रात्री दगडफेकीत झाले. रात्री १० च्या सुमारास शहरात चार ठिकाणी दगडफेक करण्यात आली. यात दोन पोलिसांनाही दगड लागले आहेत. 

शहरात रात्री दहा वाजेच्या सुमारास भोई वाडा, मण्यार मोहल्ला,  कासार गल्ली, दारू मोहला भागात दोन गटात दगडफेक झाली.  डीवायएसपी राकेश जाधव, पोलीस निरीक्षक विजय शिंदे,  पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी लागलीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.   दोन्ही गटातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाहन केल्यावर तणावपूर्ण शांतता पसरली आहे.

Web Title: Crime: Stone pelting in two groups at Amalner