शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

वडिलांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 10:47 PM

वडिलांच्या आत्महत्येस कारणीभुत असलेल्या वीज वितरण कंपनीच्या तत्कालीन कार्यकारी अभियंत्यासह ३ जणांविरुद्ध एक वर्षानंतर मुलाच्या फियार्दीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देवीज कंपनीच्या पाचोरा कार्यालयात होत होता फिर्यादीच्या वडिलांचा छळवीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांनी दुर्लक्ष केल्याने केली आत्महत्यामुलाच्या फिर्यादीवरून तब्बल एक वर्षानंतर गुन्हा दाखल

पाचोरा : वडिलांच्या आत्महत्येस कारणीभुत असलेल्या वीज वितरण कंपनीच्या तत्कालीन कार्यकारी अभियंत्यासह ३ जणांविरुद्ध एक वर्षानंतर मुलाच्या फियार्दीवरून गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ६ सप्टेंबर २०१७ रोजी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात सहायक लेखापाल पदावर कार्यरत असलेल्या आसाराम पोसल्या पाडवी (मयत) यांनी गाडगेबाबा नगर मधील भाड्याच्या घरात ६ सप्टेंबर २०१७ रोजी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी मयताने मृत्यूपूर्वी संदेश पाठवून आॅफिसच्या कामाचा त्रास होत असून कार्यालयातील आर.जी.मिश्रा, अतुल पाटील हे मानसिक छळ करून त्रास देत असल्याचा मेसेज पाठविला. त्यातच तत्कालीन कार्यकारी अभियंता यांना सर्व त्रासाची कल्पना व अडचणी सांगूनही न्यायाची भूमिका न घेता तक्रारीकडे दुर्लक्ष केले होते. या संदर्भात मयताने मृत्यूपुर्व चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यानुसार मुलगा स्वप्नील पाडवी याने पाचोरा पोलिसात दिल्यावरून तिघांविरुद्ध भादंवि कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू