प्रशासन लागलं कामाला! जळगावात नियम मोडणारी १० मंगल कार्यालयं सील, २५ गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 22:19 IST2021-02-21T22:18:50+5:302021-02-21T22:19:36+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यात २५ मंगल कार्यालयांवर गुन्हे दाखल

प्रशासन लागलं कामाला! जळगावात नियम मोडणारी १० मंगल कार्यालयं सील, २५ गुन्हे दाखल
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यात २५ मंगल कार्यालयांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर ११ मंगल कार्यालय सील करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली आहे. त्यात शहरातील दहा मंगल कार्यालयांचा समावेश आहे.
जळगाव शहरात जिल्हा पेठ, जळगाव शहर प्रत्येकी एक तर रामानंद नगर ५ व एमआयडीसी पोलीस ठाण्यात ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अमळनेर, भडगाव व चाळीसगाव ग्रामीण प्रत्येकी एक तर शहरला पाच व पाचोरा पोलिसात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. अमळनेरात २१ तर पाचोरा येथे ५ हजाराचा दंडही वसूल करण्यात आला आहे.भुसावळात डी.जे.जप्त करण्यात आला आहे. जळगाव शहरात दापोरेकर मंगल कार्यालय, यश लॉन, लाडवंजारी मंगल कार्यालय, क्रेझी होम, निराई लॉन, कमल पॅराडाईज यांच्यासह दहा मंगल कार्यालय सील करण्यात आले आहे. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.