गारखेडे येथे घराला लागलेल्या आगीत होरपळून दाम्पत्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 16:17 IST2021-05-11T16:16:17+5:302021-05-11T16:17:06+5:30

मंगळवारी मध्यरात्री गारखेडे बुद्रूक (ता. जामनेर) येथे घराला लागलेल्या आगीत पती व पत्नीचा होरपळून मृत्यू झाला.

The couple died in a house fire at Garkhede | गारखेडे येथे घराला लागलेल्या आगीत होरपळून दाम्पत्याचा मृत्यू

गारखेडे येथे घराला लागलेल्या आगीत होरपळून दाम्पत्याचा मृत्यू

ठळक मुद्देघराचे बांधकाम करावयाचे असल्याने चौधरी यांनी गावातच दुसरे घर घेतले होते भाड्याने.

लोकमत न्यूज नेटवर्क

जामनेर : गारखेडे बुद्रूक (ता. जामनेर) येथे मंगळवारी मध्यरात्री घराला लागलेल्या आगीत पती व पत्नीचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

उत्तम श्रावण चौधरी (४७) व वैशाली उत्तम चौधरी (४४) दोघे घरात झोपलेले असताना रात्री २चे सुमारास अचानक आग लागली. भुसावळ जामनेर रस्त्यावरून जात असलेल्या ट्रकचालकास घरातून धूर निघताना दिसला. ही माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने घरात प्रवेश करण्यास त्रास झाला. चौधरी यांना विवाहित मुलगी व मुलगा आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

राहते घर जीर्ण झाल्याने या घराचे बांधकाम करावयाचे असल्याने चौधरी यांनी गावातच दुसरे घर भाड्याने घेतले होते. ते भाड्याच्या घरात ते मुलासोबत राहत होते. नेमके काल दोघे पती, पत्नी भाड्याच्या घरात व मुलगा मनोज जुन्या घरात झोपला होते. दुर्दैवाने घडलेल्या घटनेत दोघांना जीव गमवावा लागला. चौधरी यांच्या घरातील सर्व सामान, जीवनावश्यक वस्तू आगीत जळून खाक झाले. सहायक पोलीस निरीक्षक राजेश काळे, विलास चव्हाण, तुषार पाटील, हंसराज वाघ, डॉ. सिद्धार्थ घोलप, सरपंच अशोक पाटील यांनी पाहणी केली. मंडळ अधिकारी डी. एम. कोळी, तलाठी मीनाक्षी पठागळे, ग्रामसेवक यांनी पंचनामा केला.

Web Title: The couple died in a house fire at Garkhede