धरणगाव तालुक्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनावर फेकला कापूस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 18:46 IST2023-03-22T18:46:03+5:302023-03-22T18:46:34+5:30
कृषिमंत्री सत्तार हे अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बुधवारी जिल्ह्यात आले होते.

धरणगाव तालुक्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनावर फेकला कापूस
भगीरथ माळी
धरणगाव, जि. जळगाव : धरणगाव तालुक्यात गारपीट झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे बुधवारी आले होते. त्यावेळी शिवसेना (ठाकरे) गटाकडून मंत्र्यांच्या वाहनावर कापूस फेकण्यात आला, ५० खोके, एकदम ओके' अशा घोषणा देण्यात आल्या.
कृषिमंत्री सत्तार हे अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बुधवारी जिल्ह्यात आले होते. धरणगाव शहरात आले असताना शिवसेना ठाकरे गटातर्फे त्यांना खोके दाखवून, तसेच त्यांच्या वाहन ताफ्यावर कापूस फेकण्यात आला. “सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है", पन्नास खोके, एकदम ओके अशा घोषणा देण्यात आल्या आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी ठाकरे गटाचे नेते गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी, शरद माळी, राजेंद्र ठाकरे, राहुल रोकडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.