चोपडा : चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन सिलिंडर बंद पडल्याने कोरोना बाधित पाच रुग्णांचा मृत्यू झाला. हे पाचही बाधित ६० ते ६५ या वयोगटातील होते. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. (5 corona patient died in Chopda last night.)
रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी आठ जणांची प्रकृती शुक्रवारी रात्री अचानक बिघडली. आठपैकी फक्त तीनच आॕक्सीजन सिलेंडर उपलब्ध झाले. उर्वरित पाच जणांना सिलेंडर न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
मुंबईतील कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीत व्हेंटीलेटरवरील कोरोना रुगांना हलविण्यास उशिर झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या आगीत 9 रुग्ण दगावले होते. यानंतर आता जळगावमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे.