'महानगरी'त एका प्रवाशाचा अकस्मात मृत्यू-कोरोनाचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 10:13 AM2020-06-04T10:13:09+5:302020-06-04T10:16:14+5:30

महानगरी एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाचा अकस्मात मृत्यू झाला.

Corona's suspicion of sudden death of a passenger in 'metropolis' | 'महानगरी'त एका प्रवाशाचा अकस्मात मृत्यू-कोरोनाचा संशय

'महानगरी'त एका प्रवाशाचा अकस्मात मृत्यू-कोरोनाचा संशय

Next
ठळक मुद्देकोरोनाच्या संशयाने दोन्ही मुले व पत्नीने उतरवला मृतदेहशववाहिका देण्यास ग्रामीण रुग्णालयात चा नकार


किरण चौधरी
रावेर, जि.जळगाव : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून रात्री सुटलेल्या महानगरी डाऊन एक्सप्रेसमधील एस - २ या आरक्षित बोगीतून वाराणसीला जाणाऱ्या एका ५२ वर्षीय प्रवाशाचा अकस्मात मृत्यू झाला. ही एक्स्प्रेस गाडी रावेर स्थानकावर थांबवण्यात आली. ही घटना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.    

        कोरोनाच्या संशयामुळे सदर मृतदेह बोगीतून खाली उतरवण्यासाठी न धजावल्याने मृतकाच्या दोन्ही मुले व पत्नीने प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर उतरवला आहे.
दरम्यान, शववाहीका उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातून नकार देण्यात आल्याने मध्य रेल्वेच्या सूत्रांनी तहसीलदार देवगुणे यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी रावेर पोलिसात आधी खबर देण्याचा सल्ला दिला आहे.

Web Title: Corona's suspicion of sudden death of a passenger in 'metropolis'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.