शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

ठेकेदार घुसले अन् ‘जलयुक्त शिवार’ला भ्रष्टाचाराची किड लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 1:03 PM

डॉ. राजेंद्रसिंह : ‘जलयुक्त शिवार’ बंद करणे ही राज्य सरकारची चूकच, पाण्यात राज्य पडले मागे, ‘लोकमत’ भेटीत व्यक्त केल्या भावना

ठळक मुद्देलोकमत संवाद

जळगाव : राज्य सरकारचा ‘जलयुक्त’ शिवार हा एक चांगला प्रकल्प होता. खरं तर तो देशासाठी एक दिशादर्शी ठरणारा प्रकल्प ठरला असता; परंतु या प्रकल्पाची आखणी करताना लोकसहभाग महत्वाचा मानला होता आणि ठेकेदारापासून हा प्रकल्प लांब ठेवावा, असे आम्ही सुचवले होते. मात्र यामध्ये ठेकेदार घुसले आणि त्यामुळे हा प्रकल्प सपशेल अयशस्वी झाला. स्पष्टपणे सांगायचं तर या कामात मोठा भ्रष्टाचार झाला तरीही ही योजना बंद करणे चुकीचे आहे, उलट त्यात सुधारणा करून ती नव्याने राबवायला हवी होती, असे प्रतिपादन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.महाराष्ट्रात ५५ टक्के पाण्याचं हे बाष्पीभवन होते, त्यामुळे आता महाराष्ट्राला धरणांमध्ये ड्रेझिंग करून पाणी साठवून ठेवण्यासारखा पर्याय शोधावा लागेल, असे ते म्हणाले.डॉ. सिंह यांनी बुधवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील ‘लोकमत’ शहर कार्यालयाला भेट दिली, यावेळी ते बोलत होते. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी व सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी त्यांचे स्वागत केले.डॉ. सिंह यांच्यासोबत लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे उपस्थित होत्या.जलयुक्त शिवार योजना यशस्वी करण्यासाठी त्यामध्ये बदल करणे आवश्यक आहे. ही योजना आपण आणि प्रभाकर देशमुख यांनी तयार केली, त्यावेळी मी आवर्जून लिहीले होते, त्याप्रमाणे ही योजना फक्त लोकसहभागातून राबवली पाहिजे. कारण या योजनेने पहिल्या वर्षी ३०० करोडची, दुसऱ्यावर्षी ४०० करोडची कामे झाली. या योजनेत ठेकेदार आला अन् भ्रष्टाचाराला सुरुवात झाली, असे ते म्हणाले.जलयुक्त शिवारच्या कामाची जबाबदारी ही पंचायत व ग्रामसभांवर दिली गेली पाहिजे तरच ती यशस्वी होऊ शकेल. एक काळ असा होता की, पाण्याच्या बाबतीत महाराष्ट्र हे क्रमांक एकचे राज्य होते. आज आत्महत्येच्या बाबतीत महाराष्ट्र क्रमांक एक ठरतोय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.देशातील ४३ टक्के धरणे ही महाराष्ट्रात आहेत; परंतु अनेक धरणे गेल्या वर्षी कोरडी होती. कारण ही धरणे कोणताही वैज्ञानिक, भौगोलिक विचार न करता उभारण्यात आली आहेत. दुसरे म्हणजे, लातूरसारख्या पाणीटंचाईग्रस्त जिल्ह्यात साखर कारखाने उभारण्यात आले आहेत.पाण्याचा आराखडा तयार करताना ज्या पध्दतीने विचार करायला हवा, तो न करता कोणताही उद्योग, कारखाना कोठेही आणून ठेवला, त्यामुळे पाण्याची भीषणता जास्त जाणवत आहे, असे ते म्हणाले.

जळगावात केळीचे उत्पादन करणे चूककेळीचे उत्पादन हे दमट हवामानाच्या प्रदेशात झाले पाहिजे. जळगावचे हवामान हे दमट नाही, त्यामुळे याठिकाणी केळीचे उत्पादन घेणे चुकीचे आहे. कारण केळीच्या उत्पादनाला पाणी जास्त लागते. यामुळेच जळगावात पाण्याची टंचाई जाणवते, असे ते म्हणाले. खरी बँक आरबीआय नाही तर धरतीच्या पोटातील पाणी ही खरी बँक आहे. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेनुसारच त्या त्याठिकाणी पिके घेतली पाहिजेत, असे मत राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.

टॅग्स :interviewमुलाखतJalgaonजळगाव