सततच्या पावसाचा बागायती कपाशीलाही मोठा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:16 IST2021-09-13T04:16:29+5:302021-09-13T04:16:29+5:30

नांदेड, ता.धरणगाव : नांदेडसह परिसरात झालेल्या सततच्या पावसाचा फटका उन्हाळ्यात मे महिन्यात लावणी केलेल्या बागायती कपाशीचा पिकांनाही बसला आहे. ...

The continuous rains also hit the irrigated cotton | सततच्या पावसाचा बागायती कपाशीलाही मोठा फटका

सततच्या पावसाचा बागायती कपाशीलाही मोठा फटका

नांदेड, ता.धरणगाव : नांदेडसह परिसरात झालेल्या सततच्या पावसाचा फटका उन्हाळ्यात मे महिन्यात लावणी केलेल्या बागायती कपाशीचा पिकांनाही बसला आहे. कपाशीच्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीच साचून पीक धोक्यात आले आहे.

नांदेडसह जवळपासच्या गावांमधील शेती शिवारातही हीच स्थिती असल्याचे दिसून आहे. परिणामी, बागायती कपाशीचे पीक बऱ्यापैकी असताना, सततच्या पावसामुळे पिकावर रोगराईचा प्रार्दुभाव दिसत आहे. कपाशीच्या कैऱ्यांवरही काळपट डाग पडले आहेत. कैऱ्या सडण्याच्या मार्गावर आहेत.

पिकांमध्ये पाणी असून, शेतातील चिखलामध्ये पाय खोलवर रुतत असल्याने कीटकनाशकांची फवारणीही शेतकऱ्यांना करता येत नाही. दिवसभर कडक ऊन पडून पावसाची उघडीप होऊन सामसूम राहत असली, तरी सायंकाळनंतर पावसाची धामधूम सुरू होते.

120921\20210912_085144.jpg

नांदेड शेतीशिवारात बागायती कपाशीच्या पीकांमध्ये पाणी साचून पीक वाया जाण्याच्या मार्गावर आहे -छाया -राजेंद्र रडे

Web Title: The continuous rains also hit the irrigated cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.