काॅंग्रेसचे चोपडा तालुकाध्यक्ष राजाराम पाटील यांचे कोरोनाने निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 22:50 IST2021-03-14T22:50:27+5:302021-03-14T22:50:55+5:30
काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाराम पाटील यांचे कोरानाने निधन झाले.

काॅंग्रेसचे चोपडा तालुकाध्यक्ष राजाराम पाटील यांचे कोरोनाने निधन
लोकमत न्यूज नेटवर्क
चोपडा : काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाराम पाटील यांचे कोरानाने निधन झाले आहे.
चोपडा येथे कोविड हाॅस्पिटलमध्ये आठ दिवसांपूर्वी ते उपचार घेत होते. परंतु त्यांना त्रास जास्त वाढल्याने जळगाव येथे हलवण्यात आले. मात्र तेथूनही पुढे अधिक उपचारासाठी त्यांना नाशिक येथे हलवण्यात आले. उपचार सुरु असताना रविवारी त्यांचा मृत्यू झाला.
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ते काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष हाेते. त्यांचा अंत्यविधी नाशिक येथेच होणार असल्याचे सांगण्यात आले. मितभाषी स्वभावाने पक्षीय संघटन वाढवणारा काँग्रेस चा कार्यकर्ता हरपला, अशी प्रतिक्रिया राजकीय क्षेत्रातून उमटत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.