शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

अस्तित्व टिकवणे अवघड तरीही काँग्रेस-राष्ट्रवादीत जागांवरून वाद!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 7:24 PM

२००४ व २००९ मधील विधानसभा निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करून लढल्या.

- सुशील देवकर

जळगाव: जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नाही. राष्ट्रवादीचा एकच आमदार निवडून आलेला असताना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांना जिल्ह्यात अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. इतकी बिकट परिस्थिती असतानाही या दोन्ही पक्षांमध्ये अद्यापही जिल्ह्यातील जागांवरून वाद सुरू असल्याचे चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी रावेरची जागा काँग्रेसला देताना झालेल्या तडजोडीत जामनेर व अमळनेर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादीला देण्याचे ठरल्याची चर्चा असताना काँग्रेस व राष्ट्रवादीचेही जिल्ह्यातील पदाधिकारी मात्र अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे. एकीकडे सेना-भाजपा जागा वाटपावरून वाद सुरू असताना काँग्रेस-राष्ट्रवादीतही मतदार संघावरूनच गोंधळ कायम असल्याचे चित्र आहे.

२००४ व २००९ मधील विधानसभा निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करून लढल्या. त्यावेळी ठरलेल्या जागा वाटपाच्या सुत्रानुसार जळगाव जिल्ह्यात काँग्रेसकडे जळगाव शहर, जामनेर, रावेर व अमळनेर असे चार मतदारसंघ तर राष्ट्रवादीकडे उर्वरीत ७ मतदार संघ असे सूत्र ठरले. मात्र २०१४ च्या निवडणुकीत सेना-भाजपा स्वतंत्र लढले. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीही स्वतंत्र लढले. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी पुन्हा एकत्र लढले. त्यावेळी जिल्ह्यातील रावेर व जळगाव हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीच्याच वाट्याला असतानाही रावेर मतदारसंघ शेवटच्या क्षणी काँग्रेसला देण्यात आला होता. त्यावेळी वरिष्ठ पातळीवर झालेल्या तडजोडीत काँग्रेसकडील जामनेर व अमळनेर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने मागून घेतल्याची चर्चा होती. मात्र याबाबत जिल्हास्तरावरील पदाधिकाऱ्यांशी कोणतीच चर्चा झालेली नाही.

आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाल्यावर काँग्रेसला केवळ रावेर व जळगाव मतदारसंघच वाट्याला येणार असल्याची चर्चा सुरू होताच काँग्रेसचे पदाधिकारी खडबडून जागे झाले. याबाबत वरिष्ठांशी संपर्कही साधण्यात येऊन पूर्वीच्या चार जागांसोबतच आणखी काही जागा मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली. तसेच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याभेटीची वेळही मागण्यात आली आहे. १३ अथवा १४ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी थोरात यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

काँग्रेसचा ‘मुक्ताईनगर’वर दावापूर्वीच्या जागा वाटपानुसार काँग्रेसकडे चार जागा तर कायम ठेवाव्याच शिवाय जेथे राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आहे, अशा जागाही काँग्रेसकडे घ्याव्यात, अशी मागणी जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे. त्यात मुक्ताईनगरच्या जागेवर काँग्रेसकडून दावा केला जात आहे. त्यासाठी लोकसभा निवडणुकीत रावेर मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांचे उदाहरण दिले जात आहे. मात्र वरिष्ठ पातळीवर याबाबत काय दखल घेतली जाते? याबाबत उत्सुकता आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगावvidhan sabhaविधानसभा