रेमडेसिविरच्या नियंत्रण कक्षाच्या दुरध्वनी क्रमांकांवरून गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:15 IST2021-04-14T04:15:36+5:302021-04-14T04:15:36+5:30
जळगाव : जिल्हा प्रशासनाने रेमडेसिविरचा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. मात्र, या कक्षाचे क्रमांक म्हणून प्रसिद्ध झालेले मोबाइल क्रमांक ...

रेमडेसिविरच्या नियंत्रण कक्षाच्या दुरध्वनी क्रमांकांवरून गोंधळ
जळगाव : जिल्हा प्रशासनाने रेमडेसिविरचा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. मात्र, या कक्षाचे क्रमांक म्हणून प्रसिद्ध झालेले मोबाइल क्रमांक कुणीही उचलत नसल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे, आरटीआय कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी सोशल मीडियावर पोस्ट करूनही याला वाचा फोडली होती. त्यानंतर, जिल्हा प्रशासनाने नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध केला आणि त्यावर फोन करून माहिती घेण्याचे आवाहन केले.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांसाठी उपयोगी ठरत असलेल्या रेमडेसिविर या इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. सातत्याने वाढत असलेल्या मागणीमुळे रुग्णांच्या नातेवाइकांची रेमडेसिविर या औषधासाठी धावपळ होत आहे. त्यावर उपाय म्हणून रेमडेसिविरचा पुरवठा हा अन्न आणि औषध प्रशासनातर्फे केला जात आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने मागील आठवड्यात काही मोबाइल क्रमांक प्रसिद्ध केले होते. त्यातील काही मोबाइल क्रमांक हे कुणीही उचलत नसल्याची तक्रार नागरिकांकडून सुरू होती. सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी याबाबत सोशल मीडियावर लाइव्हही केले. या यंत्रणेचा भोंगळ कारभार उघड झाला. त्यानंतर, जिल्हा प्रशासनाने ०२५७ २२१७४७६ हा दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध केला आणि याबाबत खुलासा केला आहे.