शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

जळगावमध्ये विवस्त्र करीत २८ विद्यार्थ्यांचे सामूहिक रॅगिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 05:05 IST

तक्रारीनंतर तिघांची हकालपट्टी

जळगाव : सिनियर विद्यार्थ्यांनी २८ विद्यार्थ्यांना विवस्त्र करून सामूहिक रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावच्या इकरा युनानी महाविद्यालयात उघडकीस आला आहे. दरम्यान, या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांची महाविद्यालयातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुदस्सर मुख्तार इनामदार ( १९, रा.परभणी) या विद्यार्थ्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. शुक्रवारी पालकांनी मुदस्सर याला वसतिगृहात दाखल केले. यानंतर शनिवारी त्याच्या बॅचचा पहिलाच दिवस होता.रात्री सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या वसतिगृहात आपापल्या रुममध्ये होते. यावेळी १५ ते २० सिनीयर्स विद्यार्थ्यांनी पहाटे दोन वाजता नव्याने दाखल झालेल्या २८ विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या एका हॉलमध्ये नेऊन रॅगिंग केले.

मुदस्सर याने दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दोन वाजता काही विद्यार्थ्यांना विवस्त्र करण्यात आले. त्यानंतर सिनेमातील पात्र, प्रियकर-प्रेयसी यांच्याप्रमाणे अ‍ॅक्टिंग करण्यास सांगून नंतर शिवीगाळ करीत एकेक विद्यार्थ्यांची ओळख-परेड घेतली.मुदस्सरने विरोध करताच तीन-चार जणांनी त्याला मारहाण केली आणि त्याच्या खिशातील मोबाईल काढून कचरापेटीत फेकला. तसेच खिशातील १८ हजार रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर त्याला फुंकर मारुन ट्युब लाईट विझवण्यास सांगितले, अन्यथा हीच ट्युबलाईट अंगावर फोडू, असे धमकावण्यात आले. हा त्रास असह्य झाल्यानंतर मुदस्सरने हॉलमधून पळ काढत स्वत:ची सुटका करुन घेतली.

सुरक्षा रक्षकाच्या मदतीने फोन करुन मुदस्सरने पालकांना माहिती दिली. पालकांनी विचारणा केल्यानंतर प्राचार्य डॉ. शोएब शेख यांनी घटनेची चौकशी दोषी तीन विद्यार्थ्यांची तडकाफडकी हकालपट्टी केली.राष्ट्रीय अ‍ॅन्टी रॅगिंंग समितीकडे तक्रारमुदस्सर याने पहाटे दिल्ली येथील अँटी रॅगिंग समितीकडे मेलव्दारे तक्रार केली. प्राचार्य डॉ. शेख यांनी सर्व २८ मुलांचे लेखी जबाब नोंदवून घेतले. मुदस्सरचे वडील परभणी येथे होमगार्ड समादेशक म्हणून कार्यरत आहेत.महाविद्यालयात झालेला रॅगिंंगचा प्रकार चुकीचा आहे़ संबंधित विद्यार्थ्याने पोलिसात व अ‍ॅन्टी रँगिंग समितीकडेही तक्रार केली असून प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहेत.- डॉ़ करीम सालार,संस्थापक अध्यक्ष, इकरा संस्था