शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बऱ्हाणपूर शहरात कोरोना बाधित १८ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 21:23 IST

बऱ्हाणपूर शहरात कोरोना बाधित १८ रुग्ण सापडले आहेत.

अवघ्या १२ कि.मी. अंतरावर घोंघावणाऱ्या संकटापासून जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरजरावेर, जि.जळगाव : तालुक्याच्या चोरवड मध्य प्रदेश सीमेपासून अवघ्या १२ कि. मी. अंतरावर असलेल्या बर्‍हाणपूर शहरात दाऊदपुरा भागातील माजी नगरसेवकाच्या परिवारासह त्याच्या संपर्कातील १८ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बर्‍हाणपूर शहरासह आपल्या सीमावर्ती भागात कमालीची खळबळ उडाली आहे. तालुक्यातून दुग्ध व्यावसायिक दूध संकलन करून बर्‍हाणपूर शहरात डेअरी व्यावसायिकांना पुरवठा करत असल्याने तथा बर्‍हाणपूर शहरातून फळभाज्या रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात आयात होत असल्याने तथा सीमा तपासणी नाक्याखेरीज शेती शिवारातील चोरट्या रस्त्याने म. प्र. तून येणाऱ्यांची वर्दळ सुरू असल्याने १२ कि. मी. अंतरावर घोंघावत असलेले संकट कोणत्याही क्षणी रावेर तालूक्यात १२ वाजवण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.बर्‍हाणपूर शहरातील एका खासगी रुग्णालयात मलकापूर येथील वृध्देने कोरोनाचा शिरकाव केल्यानंतर, दाऊदपुरा भागातील एका माजी नगरसेवकाला कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. त्यानंतर त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करून त्याचे नमुने इंदूर येथे रवाना करण्यात आले होते. त्याचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची भनक लागताच त्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातून पळ काढून शहरातील दोन तीन खासगी रुग्णालयात तपासणीसाठी प्रयत्न केले. मात्र त्यास खासगी रुग्णालयात तपासणीसाठी ठेंगा दाखवण्यात आल्याने त्याचा सहकारी व त्यास त्याचा मुलगा व चालकाने इंदूरला नेवून कोरोना रूग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले. जिल्हा प्रशासनाची पूर्व परवानगी न घेताच नाकाबंदीचे उल्लंघन करून माजी नगरसेवक पुत्र परत आल्याने कोरोना बाधित माजी नगरसेवक, त्याचा साथीदार, चालक व मुलाविरूध्द राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये बर्‍हाणपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, संबंधित माजी नगरसेवकाने खासगी रुग्णालयात जावून वैद्यकीय तपासणीपूर्वी ज्या ज्या व्यक्तींशी संपर्क साधला त्यांना व त्याच्या संपर्कात आलेल्या परिवारातील व्यक्ती असे ५३ जणांना संस्थात्मक विलगीकरण करून त्यांचे स्वॅबचे नमुने कोरोनाच्या वैद्यकीय चाचणीसाठी इंदूरला पाठवण्यात आले होते. त्यातील १८ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल प्राप्त झाला असून जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्यास दुजोरा दिला आहे.त्यात बर्‍हाणपूर शहरातील मोमीनपुरा, दाऊदपुरा, बसस्टॅण्ड परिसर, वॉर्ड क्रमांक २७, लोधीपुरा, आझादनगर या भागातील कोरोनाची बाधा झालेली रूग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील रहिवाशांचे बर्‍हाणपूर शहरासह जिल्ह्य़ातील रहिवाशांचे नातेवाईक आहेत. अवघ्या १२ कि मी अंतरावरील बर्‍हाणपूर शहरात कोरोनाचे संकट घोंघावत असल्याने जिल्हा महसूल व पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची सक्त गरज असल्याचे मत जनसामान्यांमधून व्यक्त होत आहे.रावेर तालूक्यातून दूध संकलन करून बर्‍हाणपूर शहरात पुरवठा केला जातो तथा बर्‍हाणपूर येथील लिलाव बाजारातून भाजीपाला व फळभाज्यांचा पुरवठा रावेर तालुक्यात होत असल्याने खबरदारीची उपाययोजना करून राज्य महामार्गासह चोरट्या मार्गावरही करडी नजर ठेवून सील करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaverरावेर