शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
8
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
9
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
10
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
11
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
12
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
13
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
14
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
15
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
16
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
17
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
18
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
19
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
20
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासन, मक्तेदार व नगरसेवकांच्या ‘सुंदोपसुंंदी’त नागरिक मात्र वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 12:49 IST

सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच : मक्ता रद्द करण्यासाठी सल्ला

जळगाव : शहराचा दैनंदिन सफाईचा ७५ कोटी रुपयांचा मक्ता नाशिक येथील ‘वॉटरग्रेस’ कंपनीला देण्यात आला आहे. मात्र, हा मक्ता देवून चार महिंनेही झाले नाहीत, तोपर्यंत मक्तेदार, नगरसेवक व प्रशासनाच्या ‘सुंदोपसुंंदी’मुळे हा मक्ता शहराच्या सफाईपेक्षा इतर वादांमुळेच जास्त गाजत आहे. आता कंपनीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनाबाबत बेमुदत आंदोलन केल्यामुळे शहरातील कचºयाचा प्रश्न गंभीर होत जात असून, प्रशासन, पदाधिकारी व मक्तेदार या कोडींतून जळगावकरांचे होणारे हाल थांबविण्यासाठी कुणीही प्रयत्न करताना दिसून येत नाही. दरम्यान, मनपा आवारात कामगारांनी आमदार सुरेश भोळे यांना घेराव घातला.१६ आॅगस्टपासून वॉटरग्रेस कंपनीला शहराचा सफाईचा मक्ता देण्यात आला आहे. मात्र, शहराच्या सफाईच्या प्रश्नांपेक्षा हा मक्ता मक्तेदाराने काढलेली बिले, सफाई कर्मचाºयांचे थांबलेले वेतन, मक्तेदाराकडून कचºयाऐवजी घंटागाड्यामध्ये भरलेल्या मातीबाबत चांगलाच गाजला आहे. सफाई कर्मचाºयांना किमान वेतन कायद्यानुसार व थकीत वेतन मिळत मिळावे म्हणून वॉटरग्रेस कंपनीच्या ४०० हून अधिक सफाई कर्मचाºयांनी तीन दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. यामुळे शहराच्या सफाईवर परिणाम होत आहे. शहरातील कचरा उचलला जात नसल्याने ठिकठिकाणी कचºयाचे ढीग जमा होत आहेत. मनपाचे ४०० कर्मचाºयांकडून जरी सध्या काम करून घेतले जात असले तरी शहरातील १९ प्रभागांमधील सफाई पुर्णपणे होत नसल्याची दिसून येत आहे.मक्तेदारावर संपुर्ण नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे. मात्र, मनपा प्रशासनाकडून कोणतेही लक्ष मक्तेदाराच्या कामावर ठेवले जात नसल्याचे दिसून येत नाही. रॅम्प, वजनकाटेदेखील सुरु केले नाहीत. मनपा आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील हे चार दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे रजेवर आहेत. मात्र, त्यांचा कार्यभार कोणाकडेही सोपविण्यात आलेला नाही.मक्ता रद्द केला तर पर्याय उपलब्ध करण्यावर विचार - भोळेमक्तेदाराला आतापर्यंत देण्यात आलेल्या नोटीसीनंतरही कामकाजात बदल होत नसल्याने, मक्ता रद्द करण्याबाबत हालचाली सुरु असल्याची माहिती आमदार सुरेश भोळे यांनी दिली. तसेच मक्ता रद्द केला तर न्यायालयीन अडचणी येतील का ? याबाबतही विधी तज्ज्ञांकडून सल्ला मागितला असून, मक्ता रद्द झाला तर ऐनवेळी शहराच्या सफाईसाठी पर्याय उपलब्ध करून देण्यावर देखील विचार सुरु असल्याचे भोळे यांनी सांगितले.काय आहे नेमका घोळ...सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप1 मनपाकडून देण्यात आलेल्या ठेक्याची अटी व नियमांचा भंग केल्याचा आरोप सत्ताधाºयांसह विरोधी नगरसेवकांनी केला होता. त्यानुसार मक्तेदाराला दीड कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यातच महापालिकेने मक्तेदाराचे तीन महिन्यांचे १ कोटी ३६ लाख रुपयांचे बिलं देण्यात आल्याने नगरसेवकांनी आक्षेप घेतला.2 शहरातील सफाईचा प्रश्न सुटणार नाही तो पर्यंत मक्तेदाराची बिले न देण्याचा ठराव महापालिकेत करण्यात आला. मक्तेदाराकडून उर्वरित दोन महिन्यांचे १ कोटी रुपयांचे बिल काढले आहे. मात्र, ठरावानुसार मनपाने या बिलाची रक्कम देण्यास नकार दिला आहे.3 बिलाची रक्कम न मिळाल्याने मक्तेदाराने सफाई कर्मचाºयांचे दोन महिन्यांचे वेतन थांबविले आहे. त्यामुळे सफाई कर्मचाºयांनी तीन दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. मनपा जो पर्यंत बिलाची रक्कम देणार नाही तोवर सफाई कर्मचाºयांचे वेतन देता येणार नाही अशी भूमिका मक्तेदाराची आहे. तर आधी थकीत बिलाची रक्कम मक्तेदाराने द्यावी त्यानंतर बिलांची रक्कम मिळेल अशी भूमिका मनपाने घेतली आहे.4 या वादामुळे सर्वसामान्य जळगावकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मक्तेदार व मनपा प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे नियमित कर भरणाºया जळगावकरांना सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. तसेच सफाई कर्मचाºयांना देखील वेतन मिळत नसल्याने त्यांचाही पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव