शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ मुख्याधिकारी यांना धक्काबुक्की

By admin | Updated: March 27, 2017 13:16 IST

सर्वसाधारण सभेत विरोधकांनी इतिवृत्त वाचण्याचा हट्ट धरल्याने वाद विकोपाला जावून गोंधळातच विकासाच्या 121 विषयांना मंजुरी देण्यात आली़ अवघ्या 15 मिनिटात सभा आटोपली

 गोंधळातच सर्व विषयांना मंजुरी: इतिवृत्त वाचण्यावरून वाद

भुसावळ, दि.27- नगरपालिका निवडणुकीनंतर सोमवार 27 रोजी झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी इतिवृत्त वाचण्याचा हट्ट धरल्याने वाद विकोपाला जावून गोंधळातच   विकासाच्या 121 विषयांना मंजुरी देण्यात आली़  अवघ्या 15 मिनिटात सभा आटोपली तर विरोधकांनी मुख्याधिका:यांच्या कार्यपद्धत्तीविरोधात रोष व्यक्त केला असून सत्ताधा:यांनी त्यांना हायजॅक केल्याचा आरोप केला तर मुख्याधिका:यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. विरोधी नगरसेवकांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पत्रकार परीषदेत दिली़
सोमवारी सकाळी 11 वाजता पालिका सभागृहात सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली़  पीठासन अधिकारी रमण भोळे होत़े  व्यासपीठावर उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, गटनेता मुन्ना तेली, मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर उपस्थित होत़े
15 मिनिटात आटोपली सभा
सकाळी 11 वाजता सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली़  विषयसुचीत पहिल्याच विषयाचे वाचन होत असताना विरोधी नगरसेवक पुष्पा सोनवणे, उल्हास पगारे, रवींद्र सपकाळे, दुर्गेश ठाकूर, अॅड.तुषार पाटील, कविता अशोक चौधरी यांनी पालिकेत पायी मोर्चा आणत मुख्याधिकारी ‘चले जाव’च्या घोषणा देत प्रवेश केला़  सभागृहात विरोधकांनी येत जोरदार घोषणाबाजी केली़  सभेला पुन्हा आधीपासून सुरुवात करा, अशी मागणी करण्यात आली तर सभेचा पहिलाच विषय 20 ऑगस्ट 2016 च्या सभेचे कार्यवृत्त कायम करण्याचा असल्याने तो पूर्णपणे वाचून दाखवावा, अशी मागणी केल्याने सभेत गोंधळ उडाला़ विरोधक आक्रमक झाल्यानंतर सत्ताधा:यांनी आवाजी मतदानाने सर्व विषय मंजूर-मंजूर म्हणत सभागृहाबाहेर पाय काढला़ अवघ्या 15 मिनिटात सभा आटोपण्यात आली़
मुख्याधिका:यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप
सभा आटोपल्याने विरोध संतप्त झाल्यानंतर मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांना काही नगरसेवकांनी कडे करत सभागृहाबाहेर काढले तर यावेळी पुष्पा सोनवणे, रवींद्र सपकाळे, उल्हास पगारे, संतोष (दाढी) चौधरी यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप मुख्याधिका:यांनी केला आहे. त्यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले शिवाय जिल्हाधिका:यांकडे याबाबत संबंधिताना अपात्र करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे बाविस्कर म्हणाल़े
सत्ताधारी म्हणतात गुंडगिरी खपवून घेणार नाही
नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले की, आजचा प्रकार अत्यंत निंदणीय आह़े सर्वच प्रभागातील विकासाचे विषय होते मात्र विरोधकांचे वैयक्तिक विषय होवू नये यासाठी हा खटाटोप करण्यात आला़ मुख्याधिका:यांना झालेली धक्काबुक्की दुदैर्वी बाब आह़े
उपनगराध्यक्ष युवराज लोणारी म्हणाले की, मुख्याधिकारी कर्तव्यदक्ष आहे, सत्ताधारी त्यांच्या पाठीशी आहेत़ विरोधकांना सभा चालू द्यायची नव्हती म्हणून त्यांनी गोंधळ घातला़
प्रा़ सुनील नेवे म्हणाले की, सर्वसाधारण सभेतील प्रकार लांच्छनास्पद आह़े