पिंपळकोठा गोळीबारप्रकरणी मुख्य सूत्रधारास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 10:05 PM2019-12-06T22:05:17+5:302019-12-06T22:06:07+5:30

पिंपळकोठा येथील गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधार सागर संजय पाटील (रा.अमळनेर) यास पारोळा पोलिसांनी कन्नड, जि.औरंगाबाद येथून शुक्रवारी ताब्यात घेतले.

Chief arrested for firing pistol | पिंपळकोठा गोळीबारप्रकरणी मुख्य सूत्रधारास अटक

पिंपळकोठा गोळीबारप्रकरणी मुख्य सूत्रधारास अटक

googlenewsNext
ठळक मुद्देपारोळा पोलिसांनी कन्नड येथे संशयित आरोपीस घेतले ताब्यातआरोपींकडून गंभीर स्वरुपाचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील पिंपळकोठा येथील गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधार सागर संजय पाटील (रा.अमळनेर) यास पारोळा पोलिसांनी कन्नड, जि.औरंगाबाद येथून शुक्रवारी ताब्यात घेतले.
पिंपळकोठा येथे पिलुकदेव महाराज यात्रेदरम्यान पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणात आरोपी सागर संजय पाटील रा.अमळनेर व सोबतच्या चार आरोपींनी भांडण सोडविण्यास गेलेले चेनेश्वर पाटील यांच्या पोटात गावठी कट्ट्याने फायर करून गंभीर जखमी केले होते. यानंतर आरोपी चोरीच्या मोटारसायकलवर पसार झाले होते. म्हणून त्यांच्याविरूद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील बाळा उर्फ तुषार प्रदीप पाटील (रा.नवलनगर, ता.धुळे) यास धुळे येथून तसेच अल्पवयीन आरोपी यास शिर्डी येथे जाऊन सावळी फाटा भागातून ताब्यात घेतले होते.
दरम्यान, पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे व पारोळा पोलिसांच्या गुन्हे शोध तपास पथकातील कर्मचाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार, गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी सागर संजय पाटील रा.अमळनेर हा औरंगाबाद ते चाळीसगावकडे येणार आहे. यानुसार पारोळा पोलिसांच्या तपास पथकाने कन्नड (जि.औरंगाबाद) येथील बसस्टॉप जवळ ६ रोजी सापळा रचून सागर पाटील यास शिताफीने पकडले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा पोलीस पथकातील पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, पोहेकाँ रवींद्र रावते, पोकाँ पंकज राठोड, सुनील साळुंखे, किशोर भोई, राहुल कोळी यांनी केली आहे. या गुन्ह्यातील पाचही आरोपी यांना पकडण्यास पोलीसांना यश आले असून, इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सागर संजय पाटील, जगदीश अभय उधेवाल, तुषार प्रदीप कदम, गौरव विजय पाटील आणि एक अल्पवयीन अशा पाच जणांचा संशयित आरोपींमध्ये समावेश आहे. यातील गौरव विजय पाटील हा अमळनेर पोलिसांच्या ताब्यात आहे, तर उर्वरित चार आरोपींना पारोळा पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपींकडून गंभीर स्वरुपाचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपींनी अमळनेर पोलीस ठाण्यांतर्गत दोन मोटारसायकल चोरी व जानवे येथील गावठी कट्टा दाखवून रस्तालूट केल्याचे गुन्हे केले आहे.

Web Title: Chief arrested for firing pistol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.