नशिराबादचा तो उमेदवार बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:48 IST2021-01-08T04:48:28+5:302021-01-08T04:48:28+5:30

जळगाव : तालुक्यातील नशिराबाद ग्रामपंचायत निवडणुकीत ८२ उमेदवारांपैकी ८१ उमेदवारांनी माघार घेतली असून, एका महिला उमेदवाराने माघार घेण्यास नकार ...

That candidate from Nasirabad is unopposed | नशिराबादचा तो उमेदवार बिनविरोध

नशिराबादचा तो उमेदवार बिनविरोध

जळगाव : तालुक्यातील नशिराबाद ग्रामपंचायत निवडणुकीत ८२ उमेदवारांपैकी ८१ उमेदवारांनी माघार घेतली असून, एका महिला उमेदवाराने माघार घेण्यास नकार दिला. संपूर्ण ग्रामपंचायतीत फक्त एकच उमेदवार निवडणूक रिंगणात राहिली आहे. ही उमेदवार बिनविरोध झाली आहे. मात्र अधिकृत घोषणा १८ जानेवारीला होणार आहे.

नशिराबादला नगरपंचायत व्हावी, अशी अधिसूचना गेल्या आठवड्यातच निघाली होती. मात्र तरीही ग्रामपंचायत निवडणुकीच प्रक्रिया सुरू राहिली. त्यामुळे नशिराबादच्या ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत होता. या प्रक्रियेत सहभागीच व्हायचे नाही. म्हणून सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला. ८२ पैकी तब्बल ८१ उमेदवारांनी माघार घेतली. मात्र एका महिला उमेदवाराने माघार घेण्यास नकार दिला. त्यामुळे ही उमेदवार आपल्या वॉर्डातून बिनविरोध झाली आहे. त्याची अधिकृत घोषणा मात्र निकालाच्या दिवशीच होणार आहे.

Web Title: That candidate from Nasirabad is unopposed