शहर पोलीस ठाण्यात गुन्हेगारांची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 19:56 IST2020-11-21T19:56:16+5:302020-11-21T19:56:26+5:30
जळगाव : शहर पोलीस ठाण्यात शनिवारी शहरातील सर्व गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी शनिवारी ...

शहर पोलीस ठाण्यात गुन्हेगारांची झाडाझडती
जळगाव : शहर पोलीस ठाण्यात शनिवारी शहरातील सर्व गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी शनिवारी शहर पोलीस ठाण्यात सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांना बोलावले होते. यावेळी सहाही पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, गुन्हे शोध कर्मचारी यांनाही बोलावण्यात आले होते. गुन्हेगार दत्तक योजनेबाबतही त्यांनी यंत्रणेला निर्देश दिले. दर शनिवारी पोलीस ठाण्यात गुन्हेगारांची हजेरी घेतली जाते.