रावेर : कुरेशी वाड्यातील एकास अटक
रावेर : शहरातील कुरेशी वाड्यात एकाने एक गाय व बैल जखडून बांधून ठेवल्याची खबर रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांना प्राप्त होताच फौजदार सचिन नवले यांच्या नेतृत्वाखाली पो. ना. महेंद्र सुरवाडे, पो. कॉ. सचिन घुगे, पो. कॉ. सुरेश मेढे व पो. कॉ. प्रदीप सपकाळे यांनी घटनास्थळी छापा एक बैल व एक गाय जप्त करून शेख शरीफ शेख रहेमान (वय ३८) यास अटक केली. याप्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई १० सप्टेंबर रोजी दुपारी ११:३० वाजेच्या सुमारास करण्यात आली. याबाबत पो. कॉ. सचिन घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीसात गोवंश हत्या महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम ५ ब व ९ अन्वये तथा भारतीय प्राणी संरक्षण कायदा सन १९६० च्या कलम ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.