शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात पोलीस ठाण्यासमोरच बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:40 IST

स्वत:च्या बांधकाम साईडवरच घेतला गळफास

जळगाव : खोटे नगरमधील तालुका पोलीस स्टेशनच्या समोरच असलेल्या साई सृष्टी या नवीन बांधकाम इमारतीच्या तळमजल्यावरील गाळ्यात इमारतीचे मालक, बांधकाम व्यावसायिक अनिल जगन्नाथ सूर्यवंशी (५४, रा.अष्टभुजा नगर, पिंप्राळा, मुळ रा.वढोदा, ता.चोपडा) यांनी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी दीड वाजता उघडकीस आली. पाटील यांनी आत्महत्या का केली, याचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.अनिल सूर्यवंशी यांचे जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या समोरच त्यांच्या ‘साई सृष्टी’ या तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. मंगळवारी सकाळी ते बांधकामाच्या ठिकाणी गेले. दुपारी १२ वाजेपर्यंत नातेवाईकांच्या संपर्कात होते. त्यानंतर पत्नी वैशाली यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर पुन्हा थोड्या वेळाने वैशाली यांनी त्यांच्याशी संपर्क केला, पण तेव्हाही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.डॉक्टर मुलाने घेतली धावाूर्यवंशी यांचा मुलगा डॉ. कृणाल शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात वैद्यकिय अधिकारी आहे. मंगळवारी डॉ. कृणाल रुग्णालयात असताना आईने तुझ्या वडिलांना दोन वेळा भ्रमणध्वनीवर संपर्क केला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तू बांधकामाच्या साईडवर जावून बघ म्हणून मुलाला सांगितले. त्यामुळे त्यांनी तात्काळ साईडवर धाव घेतली असता तेथे वडीलांनी तळमजल्याच्या गाळ्यात दोरीने गळफास घेतल्याचे उघड झाले. सर्वात आधी हा प्रकार शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात आला, त्यांनी तालुका पोलिसांना माहिती दिली. नातेवाईकांना कळविण्याची तयारी सुरु असतानाच मुलगा डॉ.कृणाल तेथे पोहचले होते. दरम्यान, हवालदार ईश्वर लोखंडे व सहकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शासकीय रुग्णालयात आणला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.रुग्णालयात प्रचंड गर्दीसूर्यवंशी यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पूत्र तथा जि. प.सदस्य प्रताप पाटील, गोपाळ फकिरचंद पाटील, डॉ.राधेश्याम चौधरी यांच्यासह बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक दाखल झाले होते.बांधकाम व्यवसायात कोट्यवधीचा फटकाएका नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार द्वारका नगरात त्यांनी ४ ते ५ इमारतीचे बांधकाम केलेले आहे. त्यात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे, मात्र त्यात एकही फ्लॅट बुकींग किंवा विक्री झालेला नाही. व्यवसायात मोठी गुंतवणूक झाली, बॅँकाचेही कर्ज मोठे आहे, त्यात घर विक्रीला प्रतिसाद नाही, त्यामुळे ते तणावात होते. त्यातूनच त्यांनी हे आत्महत्येचे पाऊल उचलले असावे अशी शक्यता वर्तविण्यात आली.मोबाईल, कुटुंब आणि सीडीआरमध्येच कळणार कारणअनिल सूर्यवंशी यांच्या खिशात चिठ्ठी असल्याचे सांगितले जात होते, मात्र पोलीस व नातेवाईकांनी त्यास दुजोरा दिला नाही व कारणही कोणी सांगू शकले नाही. कुटुंबातील सदस्य, मोबाईल व कॉल सीडीआर यातूनच आत्महत्येचे कारण उघड होऊ शकते, असा पोलिसांचा अंदाज आहे. दरम्यान, शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी मृतदेह वढोदा, ता.चोपडा या मूळ गावी नेण्यात आला.

टॅग्स :Jalgaonजळगाव