शहरं
Join us  
Trending Stories
1
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
2
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
3
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
4
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
5
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
6
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
7
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
8
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
9
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
10
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
11
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
12
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
13
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
14
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
15
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
16
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
17
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
18
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
19
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
20
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

थोडक्यात बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:17 IST

जळगाव : पद्मालय विश्राम गृहासमोर ठेवण्यात आलेली कचराकुंडी वेळेवर उचलण्यात येत नसल्यामुळे, कचरा ओसंडून वाहत आहे. त्यात पाळीव प्राण्यांनी ...

जळगाव : पद्मालय विश्राम गृहासमोर ठेवण्यात आलेली कचराकुंडी वेळेवर उचलण्यात येत नसल्यामुळे, कचरा ओसंडून वाहत आहे. त्यात पाळीव प्राण्यांनी हा कचरा रस्त्यावर पसरविल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना अडचणींचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरल्यामुळे साथीचे आजार निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रेल्वे स्टेशन समोरील पोलीस चौकी बंद

जळगाव : रात्रीच्या वेळी बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनातर्फे रेल्वे स्टेशन समोरील पोलीस चौकी दोन महिन्यांपूर्वी नियमित सुरू करण्यात आली होती. काही दिवस ही पोलीस चौकी सुरळीत सुरू झाल्यानंतर, आता संचारबंदीच्या काळात ही पोलीस चौकी पुन्हा बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही पोलीस चौकी पुन्हा २४ तास सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

चेन ओढल्यामुळे काशी एक्स्प्रेस रस्त्यातच थांबली

जळगाव : मुंबईहून ज‌‌ळगावकडे येणाऱ्या काशी एक्स्प्रेसची चेन एका प्रवाशाने ओढल्यामुळे, ही गाडी शिरसोलीजवळ पाच.......... दोन............... मिनिटे थांबली. हा प्रकार सोमवारी दुपारी घडला. या प्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी चेन ओढणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेऊन, त्याला जळगाव रेल्वे पोलीस प्रशासनाच्या ताब्यात दिले. त्या तरुणावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

सेवाग्राम एक्स्प्रेस रद्दमुळे विदर्भ एक्स्प्रेसला गर्दी

जळगाव : प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे रेल्वे प्रशासनाने गेल्या आठवड्यापासून मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस रद्द केली आहे. यामुळे विदर्भात जाण्यासाठी मुंबई-नागपूर विदर्भ एक्स्प्रेसला प्रवाशांची गर्दी वाढली आहे. सेवाग्राम एक्स्प्रेस रद्दमुळे या गाडीवर प्रवाशांचा भार वाढल्यामुळे, अनेक प्रवाशांची तिकिटे वेटिंगला आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पुन्हा सेवाग्राम एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण

जळगाव : गेल्या आठवडाभरापासून शिरसोली, आव्हाणे, असोदा या भागात तासनतास वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे, नागरिकांना ऐन उन्हाळ्यात उकाड्याचा सामना करावा लागत आहे. तसेच जळगाव शहरातील वाघनगर, अयोध्यानगर, पिंप्राळा या भागातही अधून-मधून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. महावितरणतर्फे सध्या विजेची तांत्रिक कामे सुरू असली तरी, या कामासाठी सर्व ठिकाणचा वीज पुरवठा खंडित न करता, काम सुरू असलेल्या भागातीलच वीज पुरवठा खंडित करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.