ऑडिटची छाननी करण्यासाठी घेतली ३२ हजाराची लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 11:54 PM2020-08-05T23:54:08+5:302020-08-05T23:54:35+5:30

विशेष लेखा परीक्षकाला अटक : नाशिक एसीबीची रात्री १० वाजता कारवाई

A bribe of Rs 32,000 was taken to audit | ऑडिटची छाननी करण्यासाठी घेतली ३२ हजाराची लाच

ऑडिटची छाननी करण्यासाठी घेतली ३२ हजाराची लाच

Next

जळगाव : जिल्ह्यातील विविध संस्थांच्या ऑडिटची छाननी करण्यासाठी ३२ हजाराची लाच घेताना जिल्हा विशेष लेखा परीक्षक रावसाहेब बाजीराव जंगले (४३, रा. जळगाव) यांना बुधवारी रात्री १० वाजता रंगेहाथ पकडण्यात आले.  नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने प्रशासकिय इमारतीत हा सापळा लावला होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात तक्रारदार जळगाव शहरातील असून त्यांनी तसेच इतर सहकारी यांनी जिल्ह्यातील विविध संस्थांचे ऑडिट पूर्ण करुन ते छाननीसाठी जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग १ रावसाहेब जंगले यांच्याकडे सादर केले होते. जंगले यांनी या कामासाठी ३१ जुलै रोजी ५२ हजाराची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने याबाबत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर नाशिकचे निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील, म्रुदुला नाईक, हवालदार दीपक कुशारे, सचिन गोसावी, एकनाथ बाविस्कर व दाभोळे यांच्या पथकाने बुधवारी रात्री १० वाजता सापळा रचून ही कारवाई केली.

Web Title: A bribe of Rs 32,000 was taken to audit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.