शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णाच्या मृत्यूनंतर ‘सहयोग क्रिटिकल’मध्ये तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:57 IST

जळगाव : अपघातग्रस्त रुग्णावर प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिल्याचा राग अनावर होऊन रुग्णासोबत आलेल्या नातेवाइकांनी सहयोग ...

जळगाव : अपघातग्रस्त रुग्णावर प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिल्याचा राग अनावर होऊन रुग्णासोबत आलेल्या नातेवाइकांनी सहयोग क्रिटिकल केअर सेंटर या रुग्णालयात गोंधळ घालून आयसीयू कक्षाची तोडफोड करून डॉक्टरांवर हल्ला केल्याचा प्रयत्न झाल्याची घटना बुधवारी रात्री १२.३० वाजता घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध दंगल, बेकायदेशीरपणे प्रवेश करून हल्ला तसेच वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी किंवा नुकसान प्रतिबंध) अधिनियम २०१० चे कलम ४,६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील विटनेर येथील विनोद भीमराव वानखेडे यांचा बुधवारी रात्री चिंचपुरा गावाजवळ अपघात झाला होता. नातेवाईक व काही जवळचे लोक त्यांना घेऊन शाहू नगरातील सहयोग क्रिटिकल केअर सेंटर या रुग्णालयात घेऊन आले. तेथे डॉ. विनोद गोविंदराव किनगे (५४,रा.शाहूनगर) व डॉ. प्रकाश सुरवाडे यांनी तपासून रुग्णावर प्राथमिक उपचार केले. रुग्णाची नाडी लागत नव्हती व बीपीही लागत नव्हता. त्यामुळे डॉ. किनगे यांनी रुग्णाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. रुग्णाला खासगी रुग्णवाहिकेतून सरकारी रुग्णालयात नेत असताना काही जण माघारी फिरले व डॉ.किनगे यांच्यावर संताप व्यक्त करून गोंधळ घातला. दुसरीकडे सरकारी रुग्णालयात विनोद वानखेडे यांना मृत घोषित केल्यानंतर संतापात आणखी भर पडली. नातेवाइकांनी आयसीयू कक्षात जाऊन काचा व इतर तोडफोड करून डॉ. किनगे यांची कॉलर पकडून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ईश्वर महाजन, महेश चव्हाण अशांनी त्यांची सुटका केली.

पोलिसांनी धाव घेतल्याने अनर्थ टळला

सहयाेग क्रिटिकल सेंटरमध्ये तोडफोड होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आयएमएचे सचिव डॉ. स्नेहल फेगडे, डॉ.राजेश पाटील व सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांना घटनेची माहिती दिली. शहर पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक गणेश बुवा, भूषण जैतकर, स्थानिक गुन्हे शाखेचे नरेंद्र वारुळे व दिनेश बडगुजर यांनी धाव घेऊन घटनेवर नियंत्रण मिळविले. रुग्णाचा मृत्यू झालेला असल्याने दोन्ही गटाची समजूत घातली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, मध्यरात्री दोन वाजता डॉ. विनोद किनगे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोट...

रुग्णाचा मृत्यू झालेला असल्याने हल्ला करणाऱ्यांची नावे निष्पन्न करता आली नाहीत, त्यामुळे कोणाला अटक करता आली नाही. रुग्णासोबत आलेल्या व्यक्ती, तोडफोड करणारे यांची माहिती काढून नावे निष्पन्न केली जातील, त्यानंतर अटकेची कारवाई होईल. सीसीटीव्ही फुटेज तपासून चेहरे स्पष्ट करता येतील.

-गणेश बुवा, सहायक पोलीस निरीक्षक