शिरपूर येथील नवविवाहितेची हत्या करणाऱ्या प्रियकराला जळगावात अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 11:45 IST2019-03-27T11:37:08+5:302019-03-27T11:45:13+5:30
शिरपूर येथील तरुणीचा २३ मार्च रोजी विवाह झाल्यानंतर २५ रोजी शिरपूरजवळ एका लॉजमध्ये तिची प्रियकराने हत्त्या केली होती.

शिरपूर येथील नवविवाहितेची हत्या करणाऱ्या प्रियकराला जळगावात अटक
जळगाव - शिरपूर येथील तरुणीचा २३ मार्च रोजी विवाह झाल्यानंतर २५ रोजी शिरपूरजवळ एका लॉजमध्ये तिची प्रियकराने हत्त्या केली होती. घटनेनंतर फरार झालेला संशयित आरोपी नरेंद्र भदाणे याला जळगावच्या शनिपेठ पोलिसांनी काशिनाथ नगरातून बुधवारी पहाटे अटक केली.
शिरपूर तालुक्यातील जातोडा येथील रहिवासी रेणुका धनगर या तरुणीचा विवाह दुसऱ्या तरुणाशी झाल्याने प्रियकर नरेंद्र उर्फ पप्पू भदाणे याने तिची हत्या केली होती. घटनेनंतर पप्पू याने पळ काढला होता. संशयीत जळगावात आल्याची माहिती मिळाल्याने बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास शनिपेठ पोलिसांनी त्याला अटक केली आणि शिरपूर पोलिसांच्या ताब्यात दिले.