बोरखेडच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची शेतातच आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 22:00 IST2018-10-12T21:59:32+5:302018-10-12T22:00:50+5:30
बोरखेडे बुद्रुक येथील शेतकरी संजय निंबा पाटील (वय ५५) यांनी सततच्या नापिकीमुळे आणि यावर्षी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने शुक्रवार सकाळी आठ वाजता त्यांच्या शेतातच त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.

बोरखेडच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची शेतातच आत्महत्या
ठळक मुद्देसततच्या नापिकीमुळे होते निराशया वर्षाच्या दुष्काळीस्थितीमुळे तणावातकर्जाच्या विवंचनेतून घेतला टोकाचा निर्णय
चाळीसगाव : बोरखेडे बुद्रुक येथील शेतकरी संजय निंबा पाटील (वय ५५) यांनी सततच्या नापिकीमुळे आणि यावर्षी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने शुक्रवार सकाळी आठ वाजता त्यांच्या शेतातच त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
त्यांनी विविध कार्यकारी सोसायटीचे पिक कर्ज घेतले होते. मेहुणबारे येथील पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चाळीसगाव येथील रुग्णालयात आणला. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. कर्जाच्या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.