शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

किमान आधारभूत किमतीचा चोपडा तालुक्यात बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 17:08 IST

केंद्र शासनाने २०२०-२१ सालासाठी जाहीर केलेल्या शेतीमालासाठी किमान आधारभूत किंमत दिला जात नसून चोपडा तालुक्यात बोजवारा उडालेला दिसून येत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची लुटमारकोणीही बोलायला पुढे येईनाशेतकरी संघटनाही गप्प

संजय सोनवणेचोपडा : केंद्र शासनाने २०२०-२१ सालासाठी जाहीर केलेल्या शेतीमालासाठी किमान आधारभूत किंमत दिला जात नसून चोपडा तालुक्यात बोजवारा उडालेला दिसून येत आहे. व्यापारी मनमानीने शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला (धान्याला) भाव देत आहेत. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापाºयांना बोलायला तयार नाही, ना शेतकरी संघटना पुढे येताहेत. शेतकरी संघटनांनी मौन का धारण केले आहे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.चोपडा तालुक्यात पांढरे सोने अर्थात कापूस मोठ्या प्रमाणात पिकत असतो. या पांढºया सोन्याला सध्या शहरासह खेडोपाडी खाजगी व्यापारी कापूस ओला आहे हे कारण पुढे करून प्रतिक्विंटल केवळ चार हजार ते चार हजार दोनशे रुपये भाव देत आहेत. वास्तविक केंद्र शासनाने कापसाला मध्यम धाग्याचा असेल तर पाच हजार ५१५ रुपये प्रतिक्विंटल आणि लांब धागा असेल तर पाच हजार ८२५ रुपये प्रति क्विंटल असा किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे. यासह सध्या मकाही चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येत आहे. मक्याचा भाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ आठशे ते हजार रुपयांच्या दरम्यान प्रतिक्विंटलला दिला जात आहे.वास्तविक किमान आधारभूत किमतीमध्ये मक्याचा भावही १८५० रुपये प्रति क्विंटल असताना नऊशे ते हजार रुपये प्रतिक्विंटल व्यापारी कसं काय खरेदी करीत आहेत? यासाठी बाजार समितीचे सभापती, संचालक मंडळ काय काम करीत आहे. व्यापारी शेतकºयांची लुटमार करीत असताना शेतकरी संघटना पदाधिकारी सुस्त का झाल्या आहेत? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. यासह तालुक्यात उडीद, मूग, सोयाबीन, तीळ, ज्वारी, बाजरी हे धान्य विक्रीसाठी येत आहे. त्यात ज्वारीला केंद्र शासनाने दिलेला किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल २६२० रुपये आहे. बाजरीसाठी २१५० रुपये प्रति क्विंटल भाव आहे. तुरीसाठी सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव आहे. मूगासाठी सात हजार १९६ रुपये असा भाव किमान आधारभूत किमतीत ठरवला आहे. उडदासाठी सहा हजार रुपये प्रति क्विंटल, सूर्यफूल ५८८५ रुपये प्रति क्विंटल, सोयाबीन ३८८० रुपये प्रति क्विंटल, तीळ ६८५५ रुपये प्रति क्विंटल असे भाव आणि उसाला प्रतिटन २८५० रुपये किमान आधारभूत किंमत ठरवली असूनही केवळ चोपडा साखर कारखाना बंद असल्यामुळे बाहेरील साखर कारखाने २४०० रुपये ते २५०० रुपये प्रति टन ऊसाला भाव देत आहेत. म्हणजे एकही शेतीमालाला केंद्र शासनाने ठरवून दिलेला किमान आधारभूत किमतीनुसार भाव मिळत नसल्याचे सध्या दिसून येत आहे.

टॅग्स :MarketबाजारChopdaचोपडा