नदी पात्रात आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 10:55 IST2018-11-08T10:53:34+5:302018-11-08T10:55:20+5:30

तालुक्यातील खामखेडा पुर्णा नदी पात्रात ३० वर्ष वयोगटातील अज्ञात महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत मिळून आला आहे.

body of an unknown woman found in river in jalgaon | नदी पात्रात आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह 

नदी पात्रात आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह 

मुक्ताईनगर, जि.जळगाव  - तालुक्यातील खामखेडा पुर्णा नदी पात्रात ३० वर्ष वयोगटातील अज्ञात महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत मिळून आला आहे. मृतदेहावर चाकूने घाव केल्याच्या जखमा पाहता घाता पाताच्या या घटनेत अज्ञाता विरुद्ध मध्यरात्री येथील पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी घटनास्थळी भेट दिली.

खामखेडा रस्त्यावरील पुर्णा नदीचे काठावर पाण्यात एका अज्ञात महीलेचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नदीच्या काठावर लागून असलेल्या या अज्ञात महिलेचे मृतदेह ३० ते ३५  वर्ष वयोगटातील असल्याचा तर्क आहे महीलेच्या अंगात काळ्या रंगाचा व्हेलवेट जॅकेट निळ्या रंगाचा शर्ट व राखाडी रंगाची पॅन्ट असा पोशाख असे या अज्ञात मृत महिलेचे वर्णन आहे. मृतदेहाची अंगावर व पोटावर हत्याराने वार करण्यात आले आहे. याप्रकरणी मुकेश माळी रा. मुक्ताईनगर यांचे खबरीवरून पोलीसात अज्ञाताविरूद्ध खुनाचा गून्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे करीत आहे दरम्यान अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी व फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट दिली. तपासाच्या दृष्टिने  अपर पोलीस अधीक्षक यांनी सूचना केल्या आहेत.

Web Title: body of an unknown woman found in river in jalgaon