खिरवड येथील सालदाराचा विहिरीत आढळला मृृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:13 IST2021-06-05T04:13:24+5:302021-06-05T04:13:24+5:30

रावेर पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, खिरवड येथील प्रमोद सुधाकर लासूरकर यांच्याकडे दोन वर्षांपासून कुंवरसिंग मंगलसिंग बारेला ...

The body of Saldar was found in a well at Khirwad | खिरवड येथील सालदाराचा विहिरीत आढळला मृृतदेह

खिरवड येथील सालदाराचा विहिरीत आढळला मृृतदेह

रावेर पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, खिरवड येथील प्रमोद सुधाकर लासूरकर यांच्याकडे दोन वर्षांपासून कुंवरसिंग मंगलसिंग बारेला हा सालदार कुटुंबासह खळवाड्यात वास्तव्यास होता.

गत तीन - चार दिवसांपासून तो काही एक न सांगता घरातून निघून गेला होता. त्याच्या पत्नीने पती हरवल्याचा तक्रार दिली होती. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास खिरवड शिवारातील सुधाकर नामदेव चौधरी यांच्या शेतातील विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला.

यासंबंधी प्रमोद सुधाकर लासूरकर यांनी दिलेल्या खबरीवरून रावेर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ. अर्जुन सोनवणे करीत आहेत.

Web Title: The body of Saldar was found in a well at Khirwad