बोदवड,दि.28- ट्रॅक्टरवर मजूर म्हणून काम करणारा गोपाळ उर्फ जंम्बो माळी (वय 50) या इसमाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. खूनाची ही घटना शुक्रवारी पहाटे 1 वाजेच्या सुमारास घडली. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ठ झाले नसले तरी गोपाळ माळी व त्याचा मुलगा हे रात्री सोबत होते व त्यांनी सोबत मद्य सेवन केले होते, असे सांगण्यात आले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}गोपाळ माळी याचा मृतदेह शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळील गल्लीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. खून झाल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.