धर्म आणि सैनिकांच्या नावावर भाजपाकडून राजकारण - अशोक गहलोत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 10:55 IST2019-09-27T10:54:04+5:302019-09-27T10:55:12+5:30
स्वातंत्र्यानंतर देशात प्रथमच अत्यंत भीतीदायक वातावरण असून भाजपा सरकार धर्म आणि सैनिकांच्या नावावर राजकारण करीत आहे, अशी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी जळगावात केली.

धर्म आणि सैनिकांच्या नावावर भाजपाकडून राजकारण - अशोक गहलोत
जळगाव - स्वातंत्र्यानंतर देशात प्रथमच अत्यंत भीतीदायक वातावरण असून भाजपा सरकार धर्म आणि सैनिकांच्या नावावर राजकारण करीत आहे, अशी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी जळगावात केली आहे.
जैन इरीगेशन कंपनीत एका कार्यक्रमासाठी ते जळगावात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली. अशोक गहलोत म्हणाले की, सरकार ईडी व सीबीआय या चौकशी संस्थांचा गैरवापर करीत आहे. असे असले तरी काँग्रेस व सर्व विरोधक एकत्र येऊन याला एकजुटीने सडेतोड उत्तर देऊ, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.