ओबीसींच्या मुद्द्यावर रक्षा खडसे व रोहिणी खडसे आमने-सामने
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 08:57 IST2021-06-25T08:57:30+5:302021-06-25T08:57:39+5:30
ओबीसींचे राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने २६ जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन पुकारले आहे.

ओबीसींच्या मुद्द्यावर रक्षा खडसे व रोहिणी खडसे आमने-सामने
जळगाव : ओबींसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात महाविकास आघाडी व भाजप आमने-सामने असताना,जळगाव जिल्ह्यात खडसे कुंटुंबीयांमध्येच गट-तट पडले आहेत. जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांनी ओबीसीच्या मुद्द्यावर भाजपवर टीका केल्यानंतर खासदार रक्षा खडसे यांनीदेखील भाजपने ओबीसी आरक्षण दिले म्हणूनच आम्ही या पदावर असल्याचे सांगत प्रत्युत्तर दिले.
ओबीसींचे राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने २६ जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाच्या आधीच ॲड. रोहिणी खडसे यांनी गुरुवारी ट्विट करत, ‘भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?. या शब्दात त्यांनी टीका केली आहे.
या ट्विट नंतर, त्यांच्या भावजयी म्हणजेच भाजपच्या खासदार रक्षा खडसेंनी जळगावातील भाजपच्या बैठकीत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. 'भाजपने जर ओबीसींचा विचार केला नसता तर कदाचित आमच्यासारख्या ओबीसी नेत्यांना संधी मिळाली नसती. त्यांनाही भाजपने विधानसभेची संधी दिली नसती', अशा शब्दांत त्यांनी रोहिणी खडसे यांचा मुद्दा खोडून काढला.