काँग्रेसच्या आंदोलनात भाजप सरकारच्या विजयाच्या घोषणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 03:11 IST2020-02-21T03:11:25+5:302020-02-21T03:11:54+5:30

जळगावातील प्रकार

BJP government announces victory in Congress agitation! | काँग्रेसच्या आंदोलनात भाजप सरकारच्या विजयाच्या घोषणा!

काँग्रेसच्या आंदोलनात भाजप सरकारच्या विजयाच्या घोषणा!

जळगाव : केंद्र सरकारच्या आरक्षणविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी झालेल्या आंदोलनात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी चक्क ‘आरक्षण रद्द करणाºया भाजप सरकारचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या. हा प्रकार एका छायाचित्रकाराच्या लक्षात आला. त्याने दुरुस्ती करायला सांगितल्यावर मग भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यास सुरुवात झाली. या प्रकारामुळे आंदोलनात काही वेळ गोंधळ उडाला.

भाजप सरकार आरक्षण रद्द करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप करत जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरूवारी दुपारी आंदोलन करण्यात आले़ त्यावेळी हा प्रकार घडला. आंदोलनात आरक्षणविरोधी भाजप सरकारचा धिक्कार असो' अशा घोषणा देत असताना काही कार्यकर्त्यांनी चक्क 'विजय असो' अशा घोषणा दिल्या. चूक लक्षात आल्यानंतर घोषणा बदलून दुसºया घोषणा देण्यात आल्या़ ‘भाजप हटाव... संविधान बचाव’ यासह सोनिया गांधी व राहुल गांधी यांचा विजय असो.. असे आंदोलनातील घोषणांचे स्वरुप होते. एकत्रित घोषणा देण्यात आल्याने एखाद्या कार्यकर्त्याकडून भाजपच्या विजयाचा उल्लेख झाला असेल. भाजपच्या विजयाच्या घोषणा काँग्रेस कधीच देणार नाही. - अ‍ॅड. संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस जळगाव जिल्हा.
 

Web Title: BJP government announces victory in Congress agitation!