Bhusawal: जुन्या वादातून तरुणाचा खून, आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 16:55 IST2023-06-18T16:54:19+5:302023-06-18T16:55:12+5:30

Bhusawal Crime News: पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना फेकरीनजीक उड्डाणपुलावर शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी आरोपी राहुल तुकाराम पाडळे (२७) यास अटक करण्यात आली आहे.

Bhusawal: Youth killed over old dispute, accused arrested | Bhusawal: जुन्या वादातून तरुणाचा खून, आरोपीला अटक

Bhusawal: जुन्या वादातून तरुणाचा खून, आरोपीला अटक

- नरेंद्र पाटील

भुसावळ - पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना फेकरीनजीक उड्डाणपुलावर शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी आरोपी राहुल तुकाराम पाडळे (२७) यास अटक करण्यात आली आहे.

मंगल शांताराम शेळके (२३, रा. फेकरी, ता. भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याची नातेवाईक लहान मुलीला एकाने चावा घेतला होता. याचा जाब विचारतच मंगल याने या इसमाच्या कानशिलात लगावली होती. त्यावेळी राहुल पाडळे याने आपल्यास आतेभावास कानशिलात का मारली म्हणून मंगल यास पाहून घेण्याची धमकी दिली होती. काही दिवसांपूर्वी ही घटना घडली होती.

शुक्रवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास राहुल हा फेकरी पुलानजीक बसलेला होता, त्याचवेळी दुचाकीने जात असलेल्या मंगलला राहुल याने अडविले आणि त्याच्याशी जुन्या भांडणातून वाद घातला. तसेच त्याची कॉलर पकडून शिवीगाळ करीत त्याला दुचाकीवरून ढकलून दिले. यात मंगलच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. आकाश शांताराम शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी हे करीत आहेत.

Web Title: Bhusawal: Youth killed over old dispute, accused arrested