शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ रेल्वे विभागाच्या उत्पन्नात 8.56 टक्के वाढ

By admin | Updated: April 27, 2017 16:38 IST

मागील वर्षीच्या तुलनेत सर्वच सेवांमध्ये उद्दिष्टापेक्षा 8.56 टक्के इतकी वाढ मिळविण्यात यश

ऑनलाइन लोकमत / पंढरीनाथ गवळी भुसावळ, जि. जळगाव, दि. 27 - मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत सर्वच सेवांमध्ये उद्दिष्टापेक्षा 8.56 टक्के इतकी वाढ मिळविण्यात यश मिळविल्याची माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी दिली. यावर्षी भुसावळ विभागाला 1287.68 कोटी रुपयांचे उपन्न मिळाले आहे. ते मागील वर्षी 1186.11 कोटी इतके होते, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, रेल्वेच्या या उत्पन्न वाढीत डीआरएम आर.के.यादव यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले असल्याचे सांगण्यात आले. विभागाला प्रवासी वाहतुकीत यावर्षी 0.76 टक्के उत्पन्न मिळाले. पार्सल वाहतुकीद्वारे 7.44 टक्के इतकी वाढ झाली. गेल्यावर्षी ती 36.83 कोटी होती.आता ती 39.57 कोटी  आहे. मालवाहतुकीतून 16.03 टक्के वाढ झाली आहे. ही वाढ गेल्यावर्षी 545.44 कोटी होती. ती यावर्षी 632.90 कोटी  झाली आहे.कांदा वाहतूकया विभागाला कांदा वाहतुकीतून यावर्षी 68.8 टक्के उत्पन्न मिळाले होते. ते मागील वर्षी 59.43 कोटी होते. यावर्षी  ते 99.89 कोटी इतके झाले. मका वाहतुकीत मागील वर्षी 3.48 कोटी रुपयाचे उत्पन्न आले होते. ते यावर्षी 55.97 कोटी इतके आले आहे.भुसावळ विभागाने रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी वर्षभर विविध ठिकाणी तिकिट तपासणी मोहीम राबविली त्यातून या वर्षी 23.95 कोटी  उत्पन्न मिळाले. पार्किग सेवेतून विभागाला 17.86 टक्के वाढ मिळाली आहे. तिकीट तपासणी मोहिमेची कोठेही चर्चा केली जात नाही. कर्मचारी, अधिकारी यांना गाडी व वेळ सांगितली जात नाही. या नंतर अचानक रेल्वेस्थानकावर जाऊन तिकीट तपासणी केली जात आहे. याचा फुकटय़ा प्रवाशांनी धसका घेतला आहे.भुसावळ रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी अनेक सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत. यात अपंग व ज्येष्ठ प्रवाशांसाठी रॅम्प  आणि लिफ्टची सोय करण्यात आली आहे शिवाय आरओ वॉटरची सोय करण्यात आली आहे. दरम्यान, फलाटाची लांबी वाढवून त्यावर शेडची सोय करण्यात आली आहे.  आरक्षणात कॅशलेसचा वापर होत आहे.4 लाख प्रवाशांना दंड प्रवासाचे तिकिट न घेता व सामान बूक न करता प्रवास करणा:या सुमारे 4 लाख प्रवाशांना यावर्षी दंड करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 23.95 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. मागील वर्षी या विभागाने 396.94 हजार फुकटय़ा प्रवाशाविरुद्ध कारवाई करण्यात आली होती.ती या वर्षी वाढून 398.23 हजार इतक्या फुकटय़ा प्रवाशांविरुद्ध दंडाची कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तिकिट तपासणी करताना रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांचे सहाय्य घेऊन कोठेही व कोणत्याही प्रवासी गाडीत तिकिट तपासणी मोहीम राबविली जात असल्याची माहिती देण्यात आली. मागील वर्षी बसने जाऊन तिकिट (बस चेक) तपासणी मोहीम राबविण्यात आली.यवर्षी देखील बसचेक मोहीम राबविली जाईल, असे सांगण्यात आले.प्रवासी संख्या घटलीभुसावळ हे या विभागाचे मुख्यालय आहे. येथे डीआरएम कार्यालय आहे. मोठे स्थानक आहे. अशा या स्थानकावरून   प्रवास करणा:या प्रवाशांच्या संख्येत 1.30 टक्क्यांनी घट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 2016-17 मध्ये 580.70,2015-2016 मध्ये 588.33 प्रवासी संख्या होती.असे असलेतरी उत्पन्नात 0.76  टक्के इतकी वाढ झाली.रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांनी तिकीट घेऊनच प्रवास करावा. कोणत्याही क्षणी, ठिकाणी व वेळी अचानक तिकीट तपासणी होऊ शकते. तिकीट नसल्यास जेलमध्ये जावे लागेल. - सुनील मिश्रा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य  व्यवस्थापक, डीआरएम कार्यालय, भुसावळ.