फुकट नास्ता दिला नाही म्हणून मारहाण; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:17 IST2021-09-03T04:17:04+5:302021-09-03T04:17:04+5:30

२३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता या दोघांनी सिंधी कॉलनीत बबलाराम नारायणदास तलरेजा (वय ४६,रा. सिंधी कॉलनी) यांच्या आस्थापनेवर ...

Beating for not giving free breakfast; Both arrested | फुकट नास्ता दिला नाही म्हणून मारहाण; दोघांना अटक

फुकट नास्ता दिला नाही म्हणून मारहाण; दोघांना अटक

२३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता या दोघांनी सिंधी कॉलनीत बबलाराम नारायणदास तलरेजा (वय ४६,रा. सिंधी कॉलनी) यांच्या आस्थापनेवर जाऊन शंभर रुपयांचा नास्ता मागितला. तलरेजा यांनी आधी पैसे द्या मगच नास्ता मिळेल, असे सांगितले असता आम्ही पैसे देणार नाहीत असे सांगून तलरेजा यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर हातातील कड्याने डोक्यात व पाठीवर मारून दुखापत केली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाधिकारी आनंदसिंग पाटील, रमेश चौधरी, गणेश शिरसाळे, मिलिंद सोनवणे व योगेश बारी यांनी गुरुवारी उमेश व आकाश या दोघांना अटक केली. त्यापैकी उमेश हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील असून, त्याच्याविरुद्ध याआधी चार गुन्हे दाखल आहेत. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्या. ए.एस. शेख यांनी तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे ॲड. स्वाती निकम यांनी काम पाहिले.

Web Title: Beating for not giving free breakfast; Both arrested